शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ ग्रामस्थांच्या जिवावर

By admin | Updated: September 20, 2014 00:35 IST

ढेबेवाडी विभाग : शाळकरी मुलांच्या मृत्युनंतरही प्रशासन ढिम्म, उपाययोजना करण्याची गरज

सणबूर : नाईकबा-बनपुरी, ता़ पाटण येथील पाझर तलावात बुडून काही दिवसांपूर्वी दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाला़ या घटनेमुळे ढेबेवाडी खोरे चांगलेच हादरले़ यापूर्वीही पाझर तलावाच्या गाळात रुतल्याने बुडून काहीजणांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे तलावातील गाळ जीवावर उठल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे़ अजून किती बळी गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे़विभागातील वाल्मीक पठारावरील दरी, खोऱ्यात व माळरानावर ठिकठिकाणी शासनाच्या कृषी व वन विभागाने वनतळी, पाझर तलाव बांधले आहेत़ भूगर्भात पाणीसाठा कायम राहावा व वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने शासनाने हे तलाव बांधले आहेत़ शासनाचा हेतू चांगला आहे़ मात्र, अनेक वर्षे या पाझर तलाव अथवा वनतळ्यांची डागडुजी अथवा साफसफाई करून वाहून आलेला गाळ न काढल्यामुळे हा साठलेला गाळ आता अनेकांच्या जीवावर उठू लागला आहे़ चार वर्षांपूर्वी ऐन दिवाळीच्या सणालाच विभागातील रुवले-नेहरुवाडी येथे तलावात पोहण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा वाल्मीक पठारावरील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला होता़ मात्र, शासनाच्या संबंधित विभागाने या घटनेचा कोणताही बोध घेतला नाही़ अशातच काही दिवसांपूर्वी या चार वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली़ नाईकबानगर येथील दोन शाळकरी मुलांचा पाझर तलावातील गाळात बुडून मृत्यू झाला़ प्रसाद भालेकर व भास्कर माने अशी त्या शाळकरी मुलांची नावे असून, हे दोघेही नाईकबा-बनपुरी येथील होते़ या दोन्ही घटना उत्सवाच्या कालावधीत घडल्याने विभागात नव्हे तर संपूर्ण पाटण तालुक्यात या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे़ या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींचा आक्रोश आणि किंकाळ्या हृदय हेलावून टाकणाऱ्या होत्या़ त्यामुळे अनेकांना त्यांचा आक्रोश पाहून अश्रू अनावर होत होते़ या घटनेमुळे गावच्या बाजूला असणारा पाझर तलाव हाच चिंतेचा विषय बनू लागला असून, अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर शासनाला जाग येणार? असा प्रश्न केला जात आहे़ संबंधितांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या योजनेतून शासनाने पाझर तलाव बांधले़ मात्र, पाझर तलावातील गाळ काढून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे़ तलावांच्या डागडुजीनंतरच अशा दुर्दैवी घटनांना आळा बसेल़- दीपक महाडिक,ग्रामस्थ, नाईकबा-बनपुरी