शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक सोसायटीसाठी उद्या मतदान!

By admin | Updated: April 3, 2015 00:36 IST

कऱ्हाड-पाटण शिक्षक सोसायटी : ‘सद्गुरू’ विरुद्ध ‘परिवर्तन’ पॅनेलमध्ये लढत

कऱ्हाड : कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या सोसायटीची ४ मार्चला निवडणूक होत आहे. सत्ताधारी ‘सद्गुरू’ विरुद्ध विरोधकांनी ‘परिवर्तन’ पॅनेल रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.शिक्षक सोसायटीत सध्या शिक्षक नेते संभाजीराव थोरात गटाची सत्ता आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली महेंद्र जानुगडे, सदाशिव कदम यांनी सद्गुरू शिक्षक संघ असे पॅनेल उभे केले आहे. तर शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटाच्या बाजीराव शेटे व सहकाऱ्यांनी शिक्षक समितीच्या अंकुश नांगरे व सहकाऱ्यांशी चर्चा करून एकत्रित परिवर्तन पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार पाहायला मिळतेय.प्रस्थापितांना शह देण्यासाठी एकास एक उमेदवार उभा करायला पाहिजे, हे विरोधकांनी जाणले. मग शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे ध्यानात घेऊन शिवाजीराव पाटील शिक्षक संघ व शिक्षक समिती यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही गटांने शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना यांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगत कऱ्हाडात एक ‘परिवर्तन’ मेळावाही घेतला; पण उमेदवारी निश्चितीनंतर एकत्र येऊ पाहणाऱ्यांच्यातच ‘परिवर्तन’ होताना दिसू लागले. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पाटणच्या शिक्षक समितीने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय मात्र, शेवटच्या दोन दिवसात हे समितीचेच पदाधिकारी संघाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दितस आहेत. तसेच कऱ्हाड तालुक्यातील समितीतील एक नाराज गटही सद्गुरू पॅनेलच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दोंदे गटाच्या शिक्षकांनी सत्ताधाऱ्यांच्याच प्रचाराचा ‘श्री गणेशा’ केलाय. वास्तविक सातारा जिल्हा शिक्षक बँक सध्या शिक्षक समितीच्या ताब्यात आहे. अन् विशेष म्हणजे, कऱ्हाड तालुक्यात त्याचे दोन विद्यमान संचालक आहेत. त्यामुळे या सोसायटी निवडणुकीत समितीचे स्वतंत्र पॅनेल उभे राहायला हरकत नव्हते; पण तसे का घडलेनाही, याबाबतही उलट सुलट चर्चा आहेत. त्याही पुढे जाऊन प्रस्थापितांविरोधात नाराजाची मोट बांधायलाही पूर्ण यश आलंय, असं दिसत नसल्याची चर्चा शिक्षकांच्यातच आहे. (प्रतिनिधी)