शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जायगाव परिसरातील रस्त्यांची दुर्दशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST

कोरेगाव : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव (ता. कोरेगाव) परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्याच ...

कोरेगाव : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव (ता. कोरेगाव) परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातील रस्त्यांबाबत बांधकाम विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची डागडुजी केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कोरेगाव तालुक्यात मोडत असलेल्या, मात्र कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव परिसरात रस्त्यांचे जाळे शंकरराव जगताप यांनी विणले होते. मात्र, मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर रस्त्यांची दुर्दशा होण्यास सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य या रस्त्यांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. जायगाव, कण्हेरखेड, वाघजाईवाडीसह अनेक गावे या रस्त्यांद्वारे जोडली गेली आहेत. मात्र ऊस वाहतुकीसह अन्य शेतीमालाच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे. खासगी वाहतूकदार या परिसरात मालवाहतूक करण्यास स्पष्ट शब्दात नकार देतात.

सह्याद्री व जरंडेश्‍वर या दोन्ही कारखान्यांचे कार्यक्षेत्र असल्याने आणि परिसरात पाण्याची उपलब्धता असल्याने उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ऊस वाहतुकीस अडथळा होत असल्याने शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

मध्यंतरीच्या काळात जायगावच्या शिष्टमंडळाने खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन जायगाव-वाघजाईवाडी-एकंबे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता, त्यांनी तत्काळ बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अभियंत्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, बांधकाम विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

एसटीच्या नकाशावरून वाघजाईवाडी गायब

एकंबे आणि जायगावच्या मधोमध वाघजाईवाडी हे गाव आहे. या परिसरात आशा भवन संस्थेचे मतिमंद मुलांचे शैक्षणिक संकुल आहे, या परिसराला भेट देण्यासाठी देशभरातून विविध संस्थांचे प्रतिनिधी येत असतात. मात्र रस्ता खराब असल्याने त्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरेगाव एसटी आगाराने जायगावकडे जाणाऱ्या बसेस एकंबेतून कण्हेरखेड मार्गे वळविल्याने वाघजाईवाडी हे गाव एसटीच्या नकाशावरून गायबच झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एसटीने लांबच्या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू केल्याने तिकीट दराबरोबरच वेळेचाही अपव्यय होत आहे. याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्तिगत लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.