शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात पालिकेसह आरोग्य विभागाकडून कोरोनामुक्तीसाठी आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

प्रभागनिहाय ९ कॅम्पद्वारे जागेवरच तपासणी ९६२ जणांची चाचणी ५५ जण पॉझेटिव्ह लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : येथील पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या ...

प्रभागनिहाय ९ कॅम्पद्वारे जागेवरच तपासणी

९६२ जणांची चाचणी ५५ जण पॉझेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर :

येथील पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करत कोरोनामुक्त मलकापूरसाठी महत्त्वाचा आराखडा तयार केला आहे. पालिकेसह काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने शहरात ९ कॅम्पद्वारे विनाकारण फिरणाऱ्यांसह ९६२ नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५५ जण पॉझिटिव्ह आले असून त्यांना विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे.

येथील पालिकेच्या वतीने कोरोनामुक्त मलकापूरसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मलकापूरचे मुख्य प्रवेशद्वार मलकापूर फाटा या ठिकाणी बॅरिकेड लावले होते. तसेच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आगाशिवनगर येथे इमर्सन कंपनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, बैलबाजार रोडसह ९ ठिकाणी व शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात होती. या ठिकाणी दिवसभर पालिकेचे कर्मचारी तळ ठोकून होते. मात्र गेली आठ दिवसांत काले प्राथमिक आरोग्य केंद्रासह पालिकेच्या पथकाने शहरात जास्तीतजास्त नागरिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी ६ ठिकाणी रॕॅपिड टेस्टचे कॅम्प लावले होते. मलकापूर फाटा, अहिल्यानगर, शास्त्रीनगर पूर्व व पश्चिम, आगाशिवनगर, लक्ष्मीनगर, शहरात ठिकठिकाणी धडाकेबाज कारवाई केली. पोलीस संरक्षणात या ६ ठिकाणी सबळ कारणांअभावी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांसह नागरिकांची रस्त्यावरच कोरोना चाचणी करण्यात आली. या वेळी ९६२ नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. या ९६२ जणांपैकी ५५ जण कोरोना पॉझेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्या ५५ जणांना पालिकेच्या रूग्णवाहिकेतून पार्ले ता. कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या पथकात मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. जी. कागदी, राजू पटेल, आरोग्य सेविका सुवर्णा पावणे, गणेश काळे, आर. एस. पाथरवट, वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साळुंखे, दादासाहेब शिंदे, रामभाऊ शिंदे, सोमाजी गावडे, पंकज बागल, सुनील शिंदे, रमेश बागल, रामदास तडाखे यांच्यासह पालिका व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

चौकट

सुपर स्प्रेडर शोधमोहीम

मलकापुरात पालिकेसह काले प्राथमिक आरोग्य केंद्राने शहरातील सुपरस्प्रेडर शोधमोहीम हाती घेतली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची धरपकड करत जागेवरच कोरोना चाचणी केली जात आहे. तर प्रभागानिहाय संशयितांची रॅपिड

टेस्ट करून कोरोनामुक्तीसाठी नियोजनबद्ध लढा सुरू केला आहे.

चौकट

९ कॅम्पचा लेखाजोखा

खंडोबानगर

२६२ तपासणी

१६ पॉझिटिव्ह, मलकपूर फाटा ८८ तपासणी

५ पॉझिटिव्ह, अदिल्यानगर

५६ तपासणी

१५ पॉझिटिव्ह, यशवंतनगर

१४४ तपासणी

५ पॉझिटिव्ह,

यादव आर्केट

३९ तपासणी

३ पॉझिटिव्ह, लक्ष्मीनगर

७५ तपासणी

पॉझिटिव्ह,

हौसाई कन्याशाळा

१२९ तपासणी

९ पॉझिटिव्ह,

मलकापूर गावठाण

१६९ तपासणी

२ पॉझिटिव्ह, आसेसे शहरात एकूण

९६२ तपासणी

५५ पॉझिटिव्ह आले आहेत.

फोटो

मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर व डॉ. राजेंद्र यादव यांच्या आदेशाने पालिकेच्या पथकासह काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट कोरोना चाचणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)

===Photopath===

160621\1814-img-20210616-wa0029.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर व डॉ. राजेंद्र यादव यांच्या आदेशाने पालिकेच्या पथकासह काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणारांची अॉन द स्पॉट कोरोना चाचणी केली. ( छाया- माणिक डोंगरे)