शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

‘किसन वीर’च्या भरारीत महिलांचे स्थान आशादायी

By admin | Updated: October 26, 2015 23:03 IST

निशिगंधा वाड : कारखान्यातील महिला मेळाव्यात प्रतिपादन

भुर्इंज : ‘स्त्री सबलीकरण महत्त्वाचे असून, किसन वीर कारखान्याच्या भरारीत महिलांना असलेले स्थान दिलासादायी चित्र आहे. या भरारीला आता कोणीही रोखू शकणार नाही,’ असा विश्वास अभिनेत्री तथा लेखिका डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केला. येथील किसन वीर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या सभासद महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. नीलिमा भोसले होत्या.डॉ. वाड म्हणाल्या, ‘महिलांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्या एकत्रिकीकरणाला किसन वीरने दिलेले व्यासपीठ महत्त्वाचे आहे. किसन वीरचे कुटुंबप्रमुख मदन भोसले यांनी राबवलेला हा उपक्रम एकमेव असा आहे.’ डॉ. नीलिमा भोसले म्हणाल्या, महिला कर्मचाऱ्यांना संधी देणारा हा पहिला कारखाना आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाची केवळ चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती होत आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या राजनंदा जाधवराव, संचालिका आशा फाळके, विजया साबळे, अनुराधा भोसले, माजी संचालिका सुनंदा चव्हाण, रंजना फाळके, विजया भोसले, पद्मा भोसले, अल्पना यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.डॉ. नीलिमा भोसले यांनी स्वागत केले. स्रेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, संपूर्ण कार्यक्षेत्रातील महिलांनी या मेळाव्यास उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. सायंकाळच्या सत्रात साहित्यिका अरुणा ढेरे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)उत्स्फूर्त प्रतिसाद  -राजकीय मेळावा नसतानाही या मेळाव्यास तब्बल पाच हजार महिलांनी केलेली गर्दी आश्चर्यचकीत करणारी ठरली. मोठ्या संख्येने आलेल्या महिलांची बैठकव्यवस्था करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक महिलांनी उन्हात थांबून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.