शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपोडे खुर्द सोसायटी ८९ व्या वर्षीही बिनविरोध

By admin | Updated: October 30, 2015 23:40 IST

१९२६ पासून सहकारातील आदर्श काम करणाऱ्या या सोसायटीने सभासदांचा विश्वास सार्थ ठरविल्यानेच बिनविरोधचा हा इतिहास

वाठारस्टेशन : ‘विना सहकार नहीं उद्धार’ या सहकाराच्या ब्रीद वाक्याला साजेसे काम करीत कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीने स्थापनेपासून म्हणजेच १९२६ पासून बिनविरोध निवडणूक करण्याचा इतिहास घडविला आहे. सलग ८९ व्यावर्षीही सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.२९ नोव्हेंबर रोजी या सोसायटीची निवडणूक होणार होती. एकूण १३ जागांसाठी २७ आॅक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी १३ अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी आमदार शशिकांत शिंदे व कोरेगाव तालुका कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम यांनी प्रयत्न केले.२०१५-२०२० या कालावधीसाठी या सोसायटीची निवडणूक २९ नोव्हेंबर रोजी जाहीर झाली होती. यासाठी दि. २३ ते २७ आॅक्टोबर दरम्यान अर्ज भरणे तसेच दि. २८ रोजी अर्ज छाननी होणार होती. सोसायटीच्या एकूण १३ जागांसाठी गणपत शिंदे, सुभाष कदम, मधुकर कदम, धोंडिराम सावंत, अजय कदम, दिलीप यादव, पदमा कदम, मालती खामकर, सतीश बनकर, रामराव जाधव, योगेश कांबळे, प्रकाश कदम यांचे अर्ज कायमवैध ठरून या सर्वांची संचालक म्हणून निवड झाली.या निवडीबद्दल विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, लक्ष्मणराव पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुनील खत्री, शिवाजीराव महाडिक, संजय झंवर, किशोर बाचल, नीलेश जगदाळे, तानाजी गोळे, नाना भिलारे, नागेश जाधव, जालिंदर कदम, सचिव संजय पवार, किशोर कदम यांनी कौतुक कले. (वार्ताहर)१९२६ पासून सहकारातील आदर्श काम करणाऱ्या या सोसायटीने सभासदांचा विश्वास सार्थ ठरविल्यानेच बिनविरोधचा हा इतिहास कायम ठेवण्यात आम्हाला यश मिळाले. या सोसायटीसाठी लवकरच धान्य साठवणूक गोदाम, खत गोदाम निर्माण करण्यात येणार आहे.- अजय कदम, सभापती,कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती