शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पाटण पंचायत समितीत नेत्यांचीच पंचायत !

By admin | Updated: November 30, 2015 01:17 IST

वर्षाचा कालावधी शिल्लक : देसाई-पाटणकर गटांतील सदस्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण, वेळ वाया घालविण्याचे काम; जनतेच्या प्रतिक्रिया

पाटण : आपापल्या विभागातील गावांचा व तेथील जनतेचा विकास करण्यासाठी निवडून आलेल्या पाटण पंचायत समितीतील सदस्यांचा केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. गेल्या चार वर्षांतील सदस्यांची कामगिरी पाहता केवळ एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण करण्याचे डावपेच आखण्यातच वेळ वाया घालविण्याचे काम केल्याच्या जनतेतून प्रतिक्रिया उमटतआहेत. नुकत्याच झालेल्या पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत काही सदस्यांनी कमालीचा गोंधळ घालून आपापल्या नेत्यांचीच पंचायत केल्यामुळे झालेल्या वादाची चर्चा जिल्हाभर गाजत आहे. पाटण तालुक्यात नेहमीच राजकारणाचा संघर्ष का पेटलेला असतो, याचे कारण शोधायचे झाल्यास विद्यमान आमदार शंभूराज देसाई व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर या नेत्यांचे प्रबळ दोन गट. पाटण पंचायत समितीत देखील आठ-आठ असे संख्याबळ आहे. त्यामुळे विकासाच्या नावानं चांगभलं, आधी फक्त एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्यातच जास्त रस असल्याचे मागील चार वर्षांच्या घटनांवरून दिसते. माजी सभापती वनिता कारंडे यांच्या काळात त्यांचे पती व बडेकर नावाच्या बांधकाम अधिकारी यांच्यातील वाद. त्यानंतर १५ आॅगस्ट रोजी पाटणकर गटाने सभापती कारंडे यांना घातलेला घेराव आणि सदस्या सुमन जाधव या बोगस जात प्रमाणपत्रावर सभापती बनू पाहतात. याचा शोध पाटणकर गटाच्या पंचायत समिती सदस्यांनीच लावला.त्यानंतर राजाभाऊ शेलार यांनी कोयनानगर येथे आयोजित केलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेवर देसाई गटाच्या सर्व सदस्यांचा बहिष्कार यावरून निर्माण झालेले वादळ आणि आता आमदार शंभूराज देसार्इंचा निषेध करण्याचा पाटणकर गटाच्या सदस्यांचा प्लॅन या सर्व घटनांमुळे पाटण तालुक्यात म्हणा किंवा पंचायत समितीत केवळ, राजकीय अडवाअडवी सुरू असल्याचा मेसेज आता बाहेर आला आहे. दरम्यान, गुरुवारच्या पंचायत समितीच्या मासिक सभेतील आकांडतांडवामुळे तर न्यायालयाला त्रास झाला. (प्रतिनिधी)सभागृहात फिफ्टी-फिफ्टी संख्याबळ...पाटणचे दोन्ही नेते आपापल्या पातळीवर एकमेकांवर टीका करतात हे ठिक. मात्र त्यांचा कड ओढून समर्थक सदस्यसुद्धा थेट नेत्यांवर भर सभेत बोलतात. मग फिफ्टी-फिफ्टी संख्याबळ असलेल्या सभागृहात भडका न उडेल तर नवलच.निषेधाची पूर्वतयारी होती...आमदार शंभूराज देसाई यांच्या निषेधाची पूर्वतयारी केल्याचा आरोप रामभाऊ लाहोटी यांनी केला. १९९२ पासून मी पंचायत समिती सभागृहात आहे. मात्र अशा प्रकारचा अतिरेक कधी झाला नव्हता. नेत्यांमुळेच आपण सदस्य झालो याचे भान ठेवून कोणी कुणावर बोलावे, याची पातळी समजली पाहिजे. दोन्ही नेत्यांच्यात चकमक होते, तो भाग वेगळा आहे आणि आमदार शंभूराज देसाई यांनी काम रद्द केले नाही तर त्या कामाचा निधी इतर विकासकामांसाठी वळविलेला आहे.माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मंजूर केलेला ३८ लाखांचा निधी इतरत्र वळविण्याचा अधिकार विद्यमान आमदारांना नाही. सत्ता आली म्हणून असे करणे योग्य नाही. भूकंपबाधित बचत भवनची नवीन इमारत होणे गरजेचे आहे. - राजाभाऊ शेलार