शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

डाळींऐवजी पालेभाज्या ताटात

By admin | Updated: October 30, 2015 23:41 IST

ग्रामीण भागात महागाईला पर्याय : आर्थिक बजेट कोलमडले; दिवाळी सणाच्या वाढीव खर्चाची धाकधूक

खटाव : महागाईच्या तडक्याने सर्वसामान्यांबरोबरच महिलावर्गाचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ही महागाई अशीच राहिली तर दिवाळी साजरी करताना सर्वांनाच खिशाचा सल्ला घ्यावा लागणार आहे. सध्या ग्रामीण भागातही महागाईमुळे डाळींऐवजी ताटात पालेभाज्याच दिसू लागल्या आहे.एकीकडे डाळींच्या दराने उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे रोजच्या जेवणात असणारा कांदा तसेच सर्वच भाज्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे महिलावर्गाचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडत आहे. सर्वसामान्यांना आतापर्यंत भाज्यांचे दर वाढले तरी रोजच्या जेवणात डाळभाताचा तरी आधार होता; परंतु या डाळींच्या दरानेच आतापर्यंतचा उच्चांक गाठत द्विशतक पार केले आहे. त्यामुळे आता तर डाळीचे नाव न घेता बटाटा तसेच कडधान्यच बरी म्हणण्याची वेळ आली आहे.वाढत्या महागाईमुळे मात्र सर्वसामान्य जनतेबरोबरच मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील लोकांची मात्र यामुळे ओढाताण होताना दिसून येत आहे. तेलापासून सर्व धान्यांचे दर हे वधारलेलेच आहेत. त्यातच सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणात असणारे काही घटक आता या वाढत्या दरामुळे काहीकाळ का होईना बाजूला ठेवावे लागणारआहेत.अगोदरच दुष्काळाच्या झळा सोसत असणाऱ्या लोकांना महागाईमुळे अधिकच आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. महिलावर्गाला विशेषत: स्वयंपाक घरात येणाऱ्या अडचणी सावरत असताना कुटुंबातील लोकांच्या आहाराचे नियोजन करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तर वाढलेल्या डाळींच्या दारमुळे सध्यातरी प्रत्येकाच्या घरातून डाळ ही थोडीशी दुर्लक्षित केली जाऊ लागली आहे. (वार्ताहर) दर उतरणार की परिस्थिती जैसे थे राहणार?डाळींचे दर आवाक्यात असल्याने पूर्वी पालेभाज्यांना कमी मागणी होती. मात्र, डाळींचे दर कडाडताच स्वयंपाकघरातून डाळी हद्दपार झाल्या असून त्यांची जागा पालेभाज्यांनी घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा सध्या पालेभाज्यांकडे कल वाढलेला दिसून येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. डाळींचे दर कमी होणार की, ही परिस्थिती जैसे थे राहणार? याचीच चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.डाळ, भात हा सर्वसामान्य लोकांचा, त्याचबरोबर लहान मुलांचा आवडीचा आहार आहे. परंतु याच डाळीचे दर कडाडल्यामुळे स्वयंपाक घरात नेहमी साठवून ठेवली जाणारी डाळ आता कमी दिसू लागली आहे. तर रोजच्या जेवणात नित्यनियमाने होणाऱ्या डाळींच्या वापरावर आम्हाला काहीसे बंधन आले आहे. डाळीचे दर कधी उतरतील याची आम्ही वाट पाहत आहोत. ऐंशी रुपयांवरून एकदम द्विशतक गाठलेल्या डाळीमुळे मात्र घरात आता कडधान्य तसेच फळभाज्याचा वापर करावा लागत आहे. - संध्या जोशी, गृहिणी