शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पितृवियोगाचं दु:ख झाकून वठविलं ‘सोंग’

By admin | Updated: April 18, 2015 00:08 IST

हिंगणगाव : सावडण्याचा कार्यक्रम करून थेट यात्रेत; भिल्लाचा देखावा सादर करण्याची परंपरा राखली एका कलाकारानं !.

सूर्यकांत निंबाळकर - आदर्की    हिंगणगाव येथील वार्षिक यात्रेचे आकर्षण व अनेक वर्षांची पंरपरा असणारे भिल्लांचे सोंग यावर्षी सादर होणार का? गावची परंपरा अखंडित राहणार का? असे एक ना अनेक प्रश्न ग्रामस्थांसमोर उभे होते; पण शरद कुंभार यांनी आपले पितृवियोगाचे दु:ख मागे ठेवत गावची पंरपरा अखंडित ठेवण्यासाठी भिल्लाचे सोंग सादर केले. यामुळे हिंगणगाव यात्रेतील परंपरा कायम टिकली आहे.याबाबत माहिती अशी की, हिंगणगाव, ता. फलटण येथे दरवर्षी श्री भैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा भरते. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भिल्लांचे सोंग याचा देखावा सादर करणे. यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी आठ ते दहापर्यंत ऐतिहासिक व पौराणिक कथेवर भिलाचे सोंग सादर करण्याची ही अनेक वर्षांची परंपरा आहे. हा देखावा पाहण्यासाठी हिंगणगावबरोबरच परिसरातील हजारो ग्रामस्थ येतात. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी भोईटे घराण्यातील लोक भिल्लांचे सोंग सादर करीत होते. त्यानंतर मारुती कुंभार यांनी सलगपणे तीस वर्षे भिल्लाचे सोंग सादर केले. वृद्धापकाळामुळे त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा शरद कुंभार हे गेल्या तेरा वर्षांपासून हे सोंग सादर करीत आहेत. असे असताना यात्रेच्या अगोदरच्या दिवशीच मारुती कुंभार (वय ७६) यांचे निधन झाले. यामुळे यात्रेत भिल्लाचे सोंग सादर होणार का?, गावची परंपरा अखंडित राहणार का? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला होता. अशा वेळी शरद कुंभार यांनी सावडणे विधी उरकून भिल्लाचे सोंग हा देखावा सादर केला. वडिलांचे निधन झाले असतानाही गावची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी भिल्लाचे सोंग सादर केले, याचे कौतुक होत आहे.अनेक वर्षांची परंपरा हिंगणगाव यात्रेत भिल्लाचे सोंग सादर करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. माझे वडील मारुती कुंभार हे तीस वर्षे हा देखावा सादर करीत होते. गेल्या तेरा वर्षांपासून मी सोंगाचा देखावा सादर करीत आहे. यावर्षी वडिलांनी देखावा सादर करण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण त्यांचे एक दिवस अगोदरच निधन झाले. त्यांची इच्छा पूर्ण करणे आणि परंपरा खंडित होऊ नये, यासाठी दु:ख बाजूला ठेवून देखावा सादर केला.