शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्कीच्या आॅईलनं जळाली भातशेती!

By admin | Updated: August 10, 2015 21:15 IST

पाटण तालुका : शेतकऱ्यांचे नुकसान; मोरेवाडीच्या शिवारात प्रकार निदर्शनास --लोकमत विशेष

अरूण पवार- पाटण -तालुक्याच्या मोरणा परिसरात होऊ घातलेल्या पवनचक्की प्रकल्पाने शेतकऱ्यांच्या जमिनीतून अतिक्रमण करताना गुंडांचा आधार घेतला. बोगस चेक देऊन बळीराजाची बोळवण केली. एवढेच काय खंडणीचे खोटे गुन्हे लावून शेतकऱ्यांना तुरुंग दाखविले. याहीपुढे जाऊन आता शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणण्याचे रसायन सोडले असून, पवनचक्की यार्डमध्ये उभ्या असलेल्या वाहनातील आॅईलची गळती सुरू झाल्याने परिसरातील भातशेती जळाल्याच्या घटना घडत आहेत. मोरेवाडीच्या शिवारात हा प्रकार निदर्शनास आल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.गेल्या तीन वर्षांपासून एका पवनचक्की प्रकल्पाचे वाहने थांबविण्याचे यार्ड मोरणा-गुरेघर प्रकल्पाकडे जाणाऱ्या रोडलगत आहे. याठिकाणी पवनचक्क्यांची पाती आणि इतर साहित्य उतरविले जात आहे. अजूनही तिथे काही वाहने उभी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे सर्वत्र पाण्याचा प्रवाह आहे. पवनचक्की यार्डच्या आसपास भातशेती आहे. गेल्या काही दिवसांपासून याच पवनचक्की यार्डामधील उभ्या असलेल्या वाहनातील विषारी रसायनाची गळती सुरू झाली आहे. गळती झालेले रसायन पाण्यात मिसळले आहे. हेच पाणी शेतीला पुरविले जात असल्यामुळे तेलमिश्रित पाण्याने भातशेती करपली आहे, असा संबंधित शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यांच्या आरोपात तथ्य असून, दोघा भावांची शेती जळून गेल्यासारखी झाली आहे. भाताची रोपे वाळून गेली आहेत. या धोक्याची चर्चा मोरणा परिसरात सुरू असून शेतकरी चिंतेत आहेत. माझी स्वत:ची भातशेती पवनचक्की कंपनीच्या वाहनातील आॅईल गळतीमुळे जळून गेली आहे. याबाबत पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधीला फोन केला असता ते प्रतिसाद देत नाहीत. झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण? कंपनीने येऊन माझ्या शेतीची पाहणी करावी व मला नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उपोषण करणार आहे.-दिलीप मोरे, शेतकरी, मोरेवाडी (पेठ शिवापूर)ता. पाटण.आॅईल गळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भातशेतीत पवनचक्की वाहनातील गळती झालेले आॅईल शिरल्याने मोरेवाडी (पेठशिवापूर) येथील दिलीप मोरे, आनंदा मोरे, विजय मोरे, हरिबा मोरे, रामचंद्र मोरे, हणमंत मोरे आदी शेतकऱ्यांची भातशेती जळून खाक झाली आहे. याबाबत कंपनीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.