शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी सेवेप्रमाणेच खेळही देतात देशसेवेची संधी

By admin | Updated: November 28, 2015 00:22 IST

केदार जाधव : ४३ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन

सातारा : ‘प्रत्येकालाच सैन्यात भरती होऊन देशाचे रक्षण करण्याची संधी मिळत नाही. परंतु देशाचे, राज्याचे नाव उज्ज्वल करण्याची संधी विविध क्रीडाप्रकार आपल्याला मिळवून देतात. आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधीही खेळांमुळे मिळते,’ असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी व्यक्त केले. ४३ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे औपचारिक उद््घाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्थानिक कसरतपटूंनी सादर केलेली पारंपरिक क्रीडाप्रकारांची प्रात्यक्षिके आणि पोलीस बँडच्या तालात झालेले डौलदार ध्वजसंचलन यामुळे हा कार्यक्रम अत्यंत शानदार ठरला. ‘संघभावना निर्माण करण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेमुळे पोलिसांचे ताणतणाव कमी होतील. परिक्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडूंनी राज्य स्पर्धेत यशस्वी व्हावे,’ अशी सद््भावना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केली. ‘या भागाला क्रीडासंस्कृतीचा मोठा वारसा असून, जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. पोलिसांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन तणावमुक्त, आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा अंगीकार करावा म्हणून या क्रीडास्पर्धा भरविल्या जातात. स्पर्धेत १४ क्रीडाप्रकार अंतर्भूत असून, येथून राज्य पातळीवर खेळाडूंची निवड होते आणि दरवेळी कोल्हापूर परिक्षेत्रातील खेळाडू राज्यात अव्वल राहतात,’ असे डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले.प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके झाल्यानंतर ध्वजसंचलन करण्यात आले. सांगली, कोल्हापूर, सोलापूर आयुक्तालय, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण आणि सातारा या क्रमाने खेळाडूंच्या पथकांनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. संचलनाचे नेतृत्व रुस्तुम शेख यांनी केले. त्यानंतर पोलीस बँडने ‘कदम कदम बढाए जा’, ‘बलसागर भारत होवो’ अशा गाण्यांची धून वाजवून देखणे आकृतिबंध सादर केले. सातारा जिल्हा पोलीस दलाचे धावपटू चटप्पा लोणार यांनी धावत क्रीडाज्योत आणली. त्यानंतर स्पर्धेची मशाल मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.रंगबिरंगी फुगे आणि शांततेचे प्रतीक म्हणून कबुतरे हवेत सोडण्यात आली आणि या देखण्या सोहळ्याची सांगता झाली. क्रीडा स्पर्धा दि. २३ रोजी सुरू झाल्या असून, दि. २९ पर्यंत चालणार आहेत. (प्रतिनिधी)दुचाकीवरील धाडसी कसरतीउंब्रजचे ‘बाइक राइडर’ बबन कुंभार यांनी सर्वांचीच दाद मिळविली. मोटारसायकलवरून त्यांनी केलेली चित्तथरारक, धाडसी कसरती प्रेक्षकांना श्वास रोखायला लावणाऱ्या ठरल्या. बाइकवर उभे राहणे, उलटे बसून चालविणे, डोक्यावर भरलेला हंडा घेऊन हात सोडून गाडी चालविणे असे प्रकार त्यांनी करून दाखविले. मल्लखांब आणि मर्दानी खेळपाहुण्यांना पोलीस बँडने सलामी दिल्यानंतर महाराजा सयाजीराव विद्यालय आणि मल्लखांब संघाच्या कसरतपटूंनी मल्लखांबावर विविध आकृतिबंध तयार करून वाहवा मिळविली. तसेच अतीतच्या मावळा प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी लाठी, काठी, बोथाटी, तलवारबाजी, दांडपट्टा अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखविली.