शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिमर्यादेच्या क्षेत्रांबाबत डॉल्बीधारकच अनभिज्ञ

By admin | Updated: September 20, 2014 00:35 IST

डेसिबल मोजणार कोण? : ‘कानावर’ हात ठेवून फक्त ‘वाजव’ म्हणा

संजय पाटील -कऱ्हाड -क्षेत्रनिहाय ध्वनिमर्यादेचे काही निकष आहेत़ कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या वेळी किती ध्वनी असावा, हेसुद्धा ठरवून दिलं गेलंय़ दरवर्षीच्या गणेशोत्सवात कार्यकर्त्यांसमोर पोलिसांकडून या नियमांचा पाढाही वाचला जातो; पण ज्यांच्यासाठी हे नियम आहेत, त्यांनाच ते माहीत नाहीत, हे विशेष! डॉल्बीसह इतर ध्वनिक्षेपकांचे आवाज जसजसे वाढत गेले, तसेच त्याचे दुष्परिणामही समोर येऊ लागले़ मनोरंजनाचं साधन आरोग्यासाठी घातक ठरू लागले आहे़ त्यातूनच ध्वनिमर्यादेच्या मुद्द्याने जोर धरला़ इतर ध्वनिक्षेपकांपेक्षा डॉल्बीला आवर घालण्याचीच अनेकांची मागणी आहे़ ध्वनिमर्यादेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्देषानुसार ध्वनिमर्यादेची औद्योगिक, वाणिज्य, निवासी व शांतता अशी चार क्षेत्रे निश्चित करण्यात आली़ या चार क्षेत्रांमध्ये कोणत्या वेळी किती आवाज असावा, हेसुद्धा ठरविण्यात आले; पण बहुतांश डॉल्बी व्यावसायिकांना या क्षेत्रांविषयी आणि तेथी/हती नाही़ एवढेच नव्हे तर निर्धारित करून दिलेली संबंधित चार क्षेत्रे ओळखायची कशी, याबाबतच डॉल्बी व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे़ त्यामुळे एखाद्या ठिकाणची ‘सुपारी’ आली की, हे व्यावसायिक कसलाही विचार न करता त्याठिकाणी डॉल्बीच्या थाप्पीसह दाखल होतात़ ज्याने डॉल्बी मागवली तो कानावर हात ठेवून ‘फक्त वाजव’ म्हणतो आणि डॉल्बीचा आॅपरेटर कानात ‘हेडफोन’ घालून दणदणाट सुरू करतो़ न्यायालयाच्या निर्देशानुसार ठरवून देण्यात आलेल्या क्षेत्रात ध्वनिमर्यादा तपासून पोलिसांकडून वारंवार कारवाई होणे अपेक्षित असते; पण दुर्दैवाने तसे होत नाही़ गणेशोत्सव व नवरात्रोत्सव कालावधीतच पोलीस डॉल्बीबाबत कडक धोरण अवलंबतात़ एरव्ही गल्लीबोळात आणि अगदी शांतता क्षेत्रातही डॉल्बीचा दणदणाट सुरू असताना पोलीस त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत़ ‘डेसिबल’ तपासात नाहीत़

गणेशोत्सव अथवा नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला की पोलीस डॉल्बीविरोधात जागर सुरू करतात; पण तोपर्यंत मंडळांनी डॉल्बीसाठी अ‍ॅॅडव्हान्स रक्कम दिलेली असते़ त्यामुळे उत्सवापूर्वी किमान एक महिन्यापासून पोलिसांनी डॉल्बीविरोधात कडक धोरण अवलंबणे व त्याची मंडळांना माहिती देणे गरजेचे आहे़ वरातीसह इतर कार्यक्रमात राजरोसपणे डॉल्बी दणाणते़ त्यावेळी पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात, हे चुकीचे आहे़- नितीन काशीद, कऱ्हाडक्षेत्रनिहाय ध्वनिमर्यादाऔद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ तर रात्री ७० डेसिबलपर्यंतवाणिज्य क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ डेसिबलपर्यंतनिवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबलपर्यंतशांतता क्षेत्रात दिवसा ५० तर रात्री ४० डेसिबलपर्यंत