शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला क्विंटलला मिळाला, ३५०० रुपयांपर्यंत भाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:15 IST

कांद्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येत असून, रविवारी सातारा बाजार समितीत आवक वाढूनही क्विंटलला एक हजारापासून साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे कांद्याचा दर पुन्हा वाढू लागल्याचे दिसून आले. तर किरकोळ स्वरुपात चांगला कांदा ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

ठळक मुद्देकांद्याला क्विंटलला मिळाला, ३५०० रुपयांपर्यंत भाव...सातारा बाजार समिती : आवक चांगली; किरकोळ दर ५० रुपये किलो

सातारा : कांद्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येत असून, रविवारी सातारा बाजार समितीत आवक वाढूनही क्विंटलला एक हजारापासून साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे कांद्याचा दर पुन्हा वाढू लागल्याचे दिसून आले. तर किरकोळ स्वरुपात चांगला कांदा ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.सातारा शेती उत्पन्न बाजार समितीत सातारा, जावळी, कोरेगाव, वाई, खटाव, फलटण आदी तालुक्यांतून भाजीपाला व इतर माल येत असतो. दर रविवारी आवक मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच गुरुवारीही आवक वाढते. सातारा बाजार समितीत वांगी, फ्लॉवर, गवारचे दर तेजीत निघाले. तर भुसार मार्केट यार्डमध्ये शेतीमालाचे दर स्थिर होते.सातारा बाजार समितीत वांग्याची अवघी १२ क्विंटल आवक झाली. तुलनेत आवक कमी झाली. मात्र, दर वाढला होता. १० किलोला दर ३५० ते ४५० रुपयांदरम्यान मिळाला. टोमॅटोचीही आवक बऱ्यापैकी झाली. ४५ क्विंटल आवक होऊन १० किलोला दर २०० ते २५० रुपयांपर्यंत मिळाला.

टोमॅटोचाही दर स्थिर होता. कोबीची फक्त ४ क्विंटल आवक होऊन दर १०० ते २०० रुपये निघाला. फ्लॉवर मात्र भाव खाऊन गेला. ५ क्विंटलची आवक होऊन १० किलोला दर ४०० ते ६०० रुपये मिळाला. तर दोडक्याची २ क्विंटल आवक झाली. याला ४५० ते ५५० रुपये दर मिळाला. दरात वाढ झाल्याचे दिसन आले. कारल्याची ४ क्विंटल आवक होऊन ४०० ते ४५० रुपये दर १० किलोला मिळाला. कारल्याच्या दरात वाढ झाली.बाजार समितीत कांद्याची ९६ क्विंटल आवक होऊन दर एक हजारापासून साडेतीन हजारापर्यंत मिळाला. तुलनेत कांद्याचा भाव वाढल्याचे दिसून आले. तर १२ दिवसांपूर्वी ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत कांद्याचा दर निघाला होता.

बाजार समितीत १० क्विंटल बटाटा आला. याला १० किलोला १०० ते ३०० रुपये दर मिळाला. यावेळी बटाट्याचा दर स्थिर राहिला तर आवक कमी झाली. वाटण्याचाही दर तेजीत आहे. १० किलोला १ हजार ते १३०० रुपये दर निघाला. पावट्यालाही दर आला. ४०० ते ६०० रुपये भाव मिळाला. गवारला ५०० ते ६०० रुपये भाव १० किलोला मिळाला. गवारच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच ७ क्विंटल आवक झाली. दरम्यान, मंडई व दुकानात मोठा कांदा ४० ते ५० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.मेथी, कोथिंबिरचे दर वाढलेलेच...सातारा बाजार समितीत मेथीची ७०० पेंडीची आवक झाली. १०० पेंडीला दर १२०० ते १५०० रुपये मिळाला. तर कोथिंबिरच्या १ हजार पेंडीची आवक झाली. १०० पेंडीला दर १ हजार ते १५०० रुपये निघाला. तुलनेत दर चांगला मिळाला. असे असलेतरी मंडई आणि दुकानात मेथी आणि कोथिंबिर पेंडी २० रुपयांच्या पुढे होती.

टॅग्स :onionकांदाSatara areaसातारा परिसरMarketबाजार