शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांपाठोपाठ कांद्याने आता शेतकऱ्यांनाही रडवले!

By admin | Updated: November 30, 2015 01:17 IST

दर कोसळले : शेतकऱ्यांची चिंता वाढली; ढगाळ हवामान, अवकाळी पावसाचा फटका

राहिद सय्यद-- लोणंद--ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस असे दुहेरी अस्मानी संकट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे असतानाच दिवाळीनंतर चार-पाच हजार रूपये प्रति क्विंटलवरून कांद्याचे दर एक-दोन हजार प्रतिक्विंटलवर कोसळले असून कांद्याच दरातील घसरणीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील निघत नसल्याने ग्राहकांना दीपावलीपूर्वी रडविणाऱ्या कांद्यामुळे आता कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.चालू कांदा उत्पादन हंगामामध्ये पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे कांदा उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यामध्ये ३४,४७८ हेक्टर म्हणजेच फक्त २८ टक्के कांदा लागवड झाली होती. उत्पादनामध्येच मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच कांदा उत्पादकांना कांद्यास सोन्याचा भाव मिळू लागला होता. कांद्याच्या दराने बाजार समित्यांमध्ये ६४०० रूपयांपर्यंत विक्रमी मजल मारली होती. तर किरकोळ बाजारात कांदा ८० रूपये किलोपर्यंत दिवाळीपूर्वी विकला जात होता. नेहमी कोसळणारे कांद्याचे दर, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाचा कांदा उत्पादकांना बसणारा फटका, सरकारचे कांदा आयात-निर्यात धोरण, वाढती शेतमजुरी आदी बाबींचा नेहमीच कांदा उत्पादकांना फटका बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक कांदा उत्पादनाकडे पाठ करून इतर पिकांकडे वळले आहेत. गेल्या हंगामामध्ये समाधानकारक पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. राज्यामध्ये खरीप कांद्याचे (लाल हळदी), सरासरी १ लाख २३ हजार ६२३ हेक्टर क्षेत्र आहे. एका आठवड्यात कांद्याचे दर दीड ते दोन हजार रूपयांनी कोसळले असून उत्पादन व लागवड कमी असताना देखील अनपेक्षितपणे एवढे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसत आहे. कांद्याची लागवड व उत्पादन कमी झाल्याने कांदा ग्राहकांना गेली दोन महिने रडवित होता तोच आता उत्पादकांनादेखील रडविताना दिसत आहे. पुढील काळात नेमकी कांद्याच्या दराची काय स्थिती राहणार याबाबत कांदा उत्पादकांना चिंता लागली आहे. वातावरणातील अनियमितपणा व अनियोजित शेतीत घेण्याची पिके त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. तसेच ढगाळ वातावरण व पावसाच्या भीतीने कांदा उत्पादकांनी जास्त प्रमाणात कांदा विक्रीला आणल्यामुळे दर कमी झाले आहेत. तरी पुढील एक दोन बाजारात दर स्थिर होऊन शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. - राजेंद्र तांबे, सभापती.