देवीसमोरील साड्या चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 11:00 IST2019-10-07T10:53:26+5:302019-10-07T11:00:20+5:30

सातारा येथील मोती चौकातील दुर्गादेवी मंडळासमोरून ७ हजार ३०० रुपयांच्या साड्या चोरून नेल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला.

One offense for stealing sarees before Goddesses | देवीसमोरील साड्या चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

देवीसमोरील साड्या चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

ठळक मुद्देदेवीसमोरील साड्या चोरीप्रकरणी एकावर गुन्हाशाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद

सातारा : येथील मोती चौकातील दुर्गादेवी मंडळासमोरून ७ हजार ३०० रुपयांच्या साड्या चोरून नेल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला.

शेखर सूर्यवंशी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. मोती चौकातील दुर्गादेवी मंडळासमोरून संबंधिताने साड्या चोरून नेल्या. शेखर सूर्यवंशी नेमका कुठे राहातो, याची चौकशी पोलीस करत आहेत.

याबाबत संदीप लक्ष्मण पवेकर (वय ४६, रा. सोमवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: One offense for stealing sarees before Goddesses