महागाव येथे एकास मारहाण; चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST2021-07-11T04:26:17+5:302021-07-11T04:26:17+5:30

सातारा : तालुक्यातील महागाव येथील एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश ...

One beaten at Mahagaon; Crime on all four | महागाव येथे एकास मारहाण; चौघांवर गुन्हा

महागाव येथे एकास मारहाण; चौघांवर गुन्हा

सातारा : तालुक्यातील महागाव येथील एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश शंकर चव्हाण, राजेंद्र शंकर चव्हाण, सूर्यकांत शंकर चव्हाण, साहिल अनिल चव्हाण (सर्व, रा. महागाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी की, अमित अर्जुन चव्हाण (वय ३६, रा. महागाव) हे त्यांचा मित्र श्रीकांत मोरे यांच्या समवेत रानात निघाले होते. यावेळी साहिल चव्हाण याने जुन्या भांडणाचा

राग मनात धरून तुला बघून घेतो, असे म्हणत दमदाटी व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि घोट्यावर दगडाने मारहाण केली. याचवेळी अमित यांना प्रकाश चव्हाण याने जमिनीवर खाली पाडले तर राजेंद्र चव्हाण याने लाकडी दांडक्याने जबड्यावर मारले. याप्रकरणी अमित यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: One beaten at Mahagaon; Crime on all four