शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची तारांबळ, नागरिकांचा गोंधळ

By admin | Updated: February 2, 2015 23:57 IST

कऱ्हाड तहसील कार्यालय : स्थलांतरित जागेतील पहिला दिवस

कऱ्हाड : कऱ्हाड तहसील कार्यालयाचे कामकाज सोमवारी पर्यायी जागेत सुरू झाले़ जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सोमवारी सुरुवात झाली खरी; पण विस्कळीत साहित्य, अधिकाऱ्यांची तारांबळ अन् नागरिकांचा गोंधळ, अशी स्थिती पहिल्या दिवशी पाहावयास मिळाली़ गेल्या दोन-तीन दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीमधून साहित्य हलविण्यास सुरुवात झाली़ आजही कर्मचारी जुन्या आणि नव्या कार्यालयादरम्यान हेलपाटे मारताना दिसत होती़ नवीन ठिकाणी पूर्वीच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालय विभागात महसूल शाखा, सहायक अधीक्षक (वित्त) विभागात पुरवठा शाखा व उपकोषागार कार्यालय, अधीक्षक (प्रशासकीय) खोलीत निवडणूक शाखा, चेंबर खोलीत दुय्यम निबंधक कार्यालय, अधीक्षक कक्षेत संजय गांधी शाखा, वकील कक्षेत कार्यालयीन अभिलेख व बारनिशी शाखा, दिवाणी स्तर शाखेत तहसीलदार कक्ष, व्ही. सी. रूम आणि संगणकीयकृत सातबारा व रोजगार हमी योजना शाखा आदी शाखांची विभागवार मांडणी करण्यात आली आहे.जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सुविधांची कमतरता असल्याने याचा त्रास अधिकाऱ्यांना तर होतोच आहे; पण नागरिकांचीही यातून सुटका नाही़ महसूल विभागासह इतर कार्यालयातील फायली, महत्त्वाचे साहित्य व कागदपत्रांची गाठोडी ठेवण्यासाठी कपाटे व साधनसामुग्री तेथे उपलब्ध नाही. ना टेबल ना खुर्च्या, ना सामान्य जनतेची बैठक व्यवस्था अशा प्रकारच्या गैरसोयींचा अनुभव तेथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना येत आहे़ येथे पिण्याच्या पाण्याची, विजेची व्यवस्थाही ठीक नाही़ त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते़ अस्वच्छ परिसर, सुविधा नसलेले स्वच्छतागृह अशा विविध अडचणी या ठिकाणी असताना कोणत्याही नियोजनाशिवाय व पूर्वतयारीअभावी कार्यालय हलविण्यात आल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे़ सर्वसामान्य जनता कामानिमित्त येथे येत आहे. मात्र, अस्ताव्यस्त साहित्य व महत्त्वाचे विभाग कोणत्या खोलीत आहेत. याची माहितीही मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)बोर्ड नसल्याने नागरिकांची फसगत --कऱ्हाड तहसील कार्यालयाचे स्थलांतर जुन्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीत केले आहे, असा साधा बोर्डही महसूल विभागाकडून लावण्यात आला नाही. त्यामुळे तेथे येणाऱ्या नागरिकांची कार्यालय गेले कु ठे, असे सांगत फसगत होत होती.ऐतिहासिक वास्तूची उणीव भरून निघणार नाही --शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ब्रिटिशकालीन इमारतीत काम करीत असताना वेगळीच छाप पडत असे; कोर्टातील वास्तूत काम करताना विशेष असे वाटत नाही. ऐतिहासिक वास्तूची उणीव या ठिकाणी काम करीत असताना नेहमी जाणवेल.- बी़ एम़ गायकवाड,  निवासी नायब तहसीलदार, कऱ्हाड  

खेड्यातून आलेल्या आजीबार्इंना आज तहसीलदार कार्यालय शोधताना खूपच कसरत करावी लागली़ इतर महिलांकडे चौकशी करताना आजीबाई़ अन् आजीबाई चालत सुटल्या  --कऱ्हाड तहसील कार्यालयात आल्यावर कार्यालय बंद असल्याचे दिसताच बाबा कार्यालय कुठं हाय रं ! आज बंद बिंद हाय की काय ? कुणीच हितं दिसना, असं एका आजीबार्इंने एकाला विचारले, तेव्हा तहसील कार्यालय जुन्या कोर्टात गेल्याचं समजलं़ तेव्हा आजीबार्इंनी डोक्यावर हात मारून घेतला अन् आता गं बया, आता एवढ्या लांब कवा चालत जायचं म्हणत त्या चालत सुटल्या़ पहिला दिवस कधी विसरणार नाही..कऱ्हाड तहसिल कार्यालयाचे येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत काम करणारे अधिकाऱ्यांना चांगलाच त्रास झाला. प्रत्येक अधिकारी एकच बोलत होता. आजचा पहिला दिवस कधीच विसरता येणार नाही.