शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या गाडीवर हातभट्टीचालकांचा हल्ला !

By admin | Updated: October 30, 2015 23:27 IST

काठ्या, बाटल्यांचा वापर : शिंदेवाडीजवळ ‘उत्पादन शुल्क’चा पाठलाग

शिरवळ : दारू अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या गाडीवर हातभट्टी- चालकांनी काठ्या, सोडा वॉटर व बीअरच्या बाटल्या फेकून हल्ला केला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणून गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.पोलिसांच्या माहितीनुसार, वीर हद्दीतील वीर धरणाजवळील कालव्याजवळ हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर मुंबईतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक नारायण रामदास मुंजाळ, डी. आर. शिंदे, हवालदार एम. के. कवडे, पी. डी. भोजने, पी. टी. कदम व डी. एम. पाटील यांनी छापा टाकला. पथकाने छापा टाकल्यानंतर ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांची गावठी दारूचा मुद्देमाल जप्त करीत नष्ट केला. त्यानंतर हे भरारी पथक पुणे बाजूकडे जीपमधून (एमएच ०१ एएन १४७६) निघाले होते. शिदेंवाडी हद्दीत ते आले असता पाठीमागून कारमधून (एमएच १२ बीपी २७७) तिघे आले. त्यांनी भरारी पथकातील गाडीच्या चालकाला ‘हातभट्टी मालक कुमार म्हस्के शेठने तुम्हाला बोलाविले आहे,’ असे सांगितले. यावेळी कारमध्ये सोडा वॉटर, बीअरच्या बाटल्या व काठ्या पाहून अधिकाऱ्यांनी गाडी थांबविली नाही. तेव्हा कारमधील तिघांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत जीप अडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोडा वॉटर, बीअर बाटल्या व काठ्यांनी हल्ला केल्याने जीपचे सुमारे सात हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी हातभट्टीचालक कुमार म्हस्के व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)