शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आता गाड्या नाहीत जाणार ठाण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 22:19 IST

पोलिस महानिरीक्षकांचे आदेश : अपघातातील गाड्या पंचनाम्यानंतर थेट मालकांकडे

सातारा : जिल्हा कार्यक्षेत्रात होणारे अपघात यांच्यासह पोलिसांनी कारवाई केलेली वाहने पंचनामा आणि आरटीओ तपासणी झाल्यानंतर आता थेट मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश पोलिस महानिरीक्षकांनी दिले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलिस कार्यरत झाले आहेत. या आदेशामुळे पोलिस ठाणे आवारात धूळखात पडलेल्या गाड्यांची संख्या आता कमी होईल.जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या आणि मालकांनी दावा न केलेल्या तब्बल ६०६ वाहनांवर दोन वर्षांत कोणीच हक्क सांगायला आले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे पोलिस ठाणे परिसरात शेकडो गाड्या आवारात धूळखात पडून आहेत. ही वाहने बेवारसस्थितीत असल्यामुळे अनेकदा त्यांचे सुटे भाग चोरीला जाणे, यासारखे प्रकार घडतात. याविषयी ‘लोकमत’ ने १९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक यांनी याविषयीचे लेखी आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार यापुढे अपघातातील गाडी पंचनामा झाल्यानंतर तातडीने मालकांच्या स्वाधीन करण्यात यावी, असे सूचित केले आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने चलसंपत्ती पडून राहण्यापेक्षा त्याचा वापर व्हावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यात पहिल्यांदाच सातारा पोलिसांनी याविषयी कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.सातारा जिल्ह्यातील २९ पोलिस ठाणे परिसरात बेवारस स्थितीत एकूण ५६७ दुचाकी वाहने, तीनचाकी ४ तर चारचाकी ३५ वाहने व त्यांचे सांगाडे पडून आहेत.या वाहनांच्या मालकांविषयी वेळोवेळी आवाहन करूनही पोलिसांना वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीच दावा केला नाही. त्यामुळे ही वाहने अद्यापही बेवारसस्थितीत पोलिस ठाणे आवारात पडून आहेत.यासाठी सातारा पोलिसांच्या वतीने या वाहनांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता; पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आवाहन करूनही जर मालकांनी या गाड्यांवर दावा सांगितला नाही तर लिलावपद्धतीने या गाड्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) वाहन ही देशाची चलसंपत्ती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही चलसंपत्ती गंजत पडणं म्हणजे राष्ट्रीय नुकसान आहे. पोलिस कायद्यातील कलम ८५ व ८७ यांचा वापर करून सातारा जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील वाहने मूळ मालकापर्यंत पोहोचावीत व या यंत्रसामुग्रीचा योग्य वापर व्हावा, यासाठी लवकरच पुढील कारवाई सुरू होईल.- अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, सातारा