शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नको हद्द अन् सुविधा.. आम्हाला हवी शाहूपुरी!

By admin | Updated: April 3, 2015 00:35 IST

अंजली कॉलनीतील रहिवाशांची मागणी : हद्दीच्या वादामुळे पालिकेला अडीच कोटींचा फटका

दत्ता यादव - सातारा  गेल्या पंधरा वर्षांहून अधिक वर्षे पालिकेच्या सुखसुविधेचा उपभोग घेत आलेल्या अर्कशाळानगर, अंजली कॉलनी आणि सुयोग कॉलनीतील रहिवाशांनी पालिकेच्या हद्दीत समाविष्ट होण्यास नकार दिल्याने पालिकेचा तब्बल अडीच कोटींहून अधिक महसूल बुडण्याच्या मार्गावर आहे. असे असताना या कॉलनीतील रहिवाशांनी नको हद्द अन् सुविधा..आम्हाला हवी शाहूपुरी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा हद्दीचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.शहराला लागूनच अर्कशाळानगर, अंजली आणि सुयोग कॉलनी वसली आहे. या वसाहतीमध्ये १५१ घरे असून, सध्या जीवन प्राधिकरण आणि नगर पालिकेकडून या कॉलनीला सुखसुविधा पुरवल्या जात आहेत. परंतु सुमारे पंधरा वर्षे ११५ रहिवाशांनी अडीच कोटींची थकबाकी भरली नाही. त्यामुळे पालिकेने पथदिवे, पाणी आणि घंटा गाडीची सुविधा बंद केल्या आहेत. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर हद्दीचा वाद उफाळून आला आहे. कोणत्याही परिस्थितीत पालिकेच्या हद्दीमध्ये येण्यास या रहिवाशांचा विरोध आहे. येथील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून अनेक मुद्दे पुढे आले. पूर्वी ज्यावेळी गॅजेट झाले. त्यावेळी या कॉलनी वसल्या आहेत. या ठिकाणचा सर्व्हे नंबरही शहराच्या हद्दीत येत नाही. १९९९ मध्ये सुरुवातीला येथील रहिवाशांना पालिकेने थकबाकी मागितली. त्यामुळे रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली. शहराच्या हद्दीत हा भाग येत नसून थकित बिले रद्द करण्यात यावीत, असे न्यायालयाने निकालात नमूद केले असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. या निकालावरही पालिकेने अपील केले नाही. इतके दिवस गप्प बसल्यानंतर १५ वर्षांनंतर जप्तीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या. सध्या हा वाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, न्यायालय जो निर्णय देईल, तो मान्य असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला सामाविष्ट करावे, अशी आमची मागणी आहे. परंतु न्यायालयाच्या निकालानंतरच नेमकी भूमिका स्पष्ट होणार आहे, त्यामुळे आताच यावर बोलणे उचित ठरणार नाही, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे. तर पालिकेची भूमिका याहून वेगळी आहे. पथदिवे, पाण्याची सोय, रस्ते, घंटाघाडी या सगळ्या सुविधा या कॉलनीला पुरवत आहोत. त्यामुळे शासनाचा कर या लोकांनी भरलाच पाहिजे, अशी पालिकेची भूमिका आहे. कर भरला नसल्यामुळेच नाईलाजास्तव सुविधा खंडित केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.नुकसानीला जबाबदार कोण?या तिन्ही कॉलनतील लोकांनी पंधरा वर्षांपासून पालिकेचा कसलाही कर भरला नाही. त्यामुळे तब्बल अडीच कोटींची थकबाकी आहे. हा महसूल आता वसूल होणार का किंवा यापुढेही पालिका या कॉलनीला सुखसुविधा पुरवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर पालिकेने या कॉलनीच्या सर्व सुविधा बंद केल्यामुळे येथील रहिवाशांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्देवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.