शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी समर्थकांची चक्क भाजपसोबत आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:38 IST

Grampanchyat Election Satara- तारळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी म्हणजेच पाटणकर गट आणि भाजप एकत्र आले असल्याचे चित्र दिसत आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत असून तारळे ग्रामपंचायतीत सत्तांतर होणार की जैसे थे स्थिती राहणार, हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

ठळक मुद्देतारळेत वेगळीच समिकरणे : १७ जागांसाठी लढतनिवडणुकीकडे पाटण तालुक्याचे लक्ष

अरुण पवारपाटण : तारळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी म्हणजेच पाटणकर गट आणि भाजप एकत्र आले असल्याचे चित्र दिसत आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत असून तारळे ग्रामपंचायतीत सत्तांतर होणार की जैसे थे स्थिती राहणार, हे काही दिवसातच स्पष्ट होईल.तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून १०७ ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आता ७२ ग्रामपंचायतींसाठी लढत होत आहे. त्यापैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तारळे ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. सध्या या ग्रामपंचायतीवर मंत्री शंभूराज देसाई गटाची सत्ता आहे. तारळे विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता ती परिस्थिती राहिलेली नाही.

२०११ सालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. आणि दहा जागा मिळवल्या होत्या. तर देसाई गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आत्ताची निवडणुकही देसाई गटाला सोपी राहिलेली नाही.यावेळच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी गट आणि भाजपच्या रामभाऊ लाहोटी यांच्यात आघाडी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी अकरा जागांवर तर भाजपा सहा जागांवर निवडणूक लढवत आहे. तसेच जाधव गल्ली या वॉर्डसाठी अपक्ष म्हणून सोमनाथ पाटील हे रिंगणात आहेत.

राष्ट्रवादी आणि भाजप यांनी केलेल्या आघाडीला नवलाईदेवी तारळे विकास आघाडी असे नाव आहे. तर मंत्री देसाई गटाने नवलाईदेवी विकास पॅनेल असे नाव दिले आहे. तारळे ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी विकास जाधव, अभिजित पाटील, राजाभाऊ जाधव, एस. के. वाघडोळे आदी प्रमुख कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

परिवर्तन करण्यासाठी विडा उचललेल्या राष्ट्रवादी आणि भाजपा आघाडीमध्ये पाटणकर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ जाधव, राजेंद्र जाधव, नाना पाटील, अभिजीत जाधव हे कार्यकर्ते झटत आहेत. सध्यातरी तारळे ग्रामपंचायतीची सत्ता मंत्री देसाई गटाच्या हातात आहे. त्यामध्ये १३ देसाई गट तर ४ पाटणकर गट असे बलाबल आहे.रामभाऊ लाहोटींच्या हालचालींकडे लक्षग्रामपचायतीसाठी निवडणुकीत उतरलेल्या भाजपच्या माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी यांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण तारळे ग्रामपंचायत असो किंवा विभागातील इतर निवडणुका असो. लाहोटी यांचा करिष्मा उठावदार दिसून आला आहे. यापूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांचे खंदे समर्थक म्हणून रामभाऊ लाहोटी ओळखले जात होते. मात्र, गत पाच वर्षापुर्वी मतभेद निर्माण झाल्यामुळे ते देसाई गट सोडून भाजपमध्ये गेले.महाविकास आघाडीचा फार्म्युला पायदळीतारळे ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादी समर्थकांनी भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात असलेल्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तारळे ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीकडून पायदळी तूडवण्यात आला असल्याचे दिसते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसर