शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकींचा अद्याप ठावठिकाणा नाही

By admin | Updated: May 4, 2015 00:24 IST

गूढ वाढले : रायगावच्या नावडकर कुटुंबातील तिघींचा शोध सुरूच

मेढा : जावळी तालुक्यातील रायगावच्या बेपत्ता कुटुंबातील प्रवीण धनाजी नावडकर यांचा मृतदेह कास भागात आढळल्यानंतर त्यांच्या पत्नी व दोन लहानग्या मुलींचा शोध रविवारीही सुरूच होता. अद्याप त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे. प्रवीण यांच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीच्या आधारे कास तलावालगतचा जंगल परिसर पोलिसांनी पिंजून काढला. रायगाव (ता. जावळी) येथील प्रवीण नावडकर हे आपली पत्नी नूतन तसेच श्रावणी व समृद्धी या दोन मुलींसह दुचाकीवरून (एमएच ११ बीयू ९९२२) २० एप्रिल रोजी काळंगवाडी येथे नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी म्हणून घराबाहेर पडले होते. मात्र, ते काळंगवाडी येथेही गेले नाहीत आणि परत रायगावलाही आले नाहीत. त्यामुळे प्रवीण यांचे वडील धनाजी यांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात २१ एप्रिल रोजी चौघेजण बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. गेल्या चार दिवसांपासून कास परिसरात एक दुचाकी बेवारस स्थितीत असल्याचे परिसरातील नागरिकांनी बघितले. ती नावडकर यांची असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, ‘आम्ही सर्वजण घरगुती कारणावरून आत्महत्या करीत आहोत,’ अशा आशयाची चिठ्ठी दुचाकीजवळ आढळून आली. त्यानुसार कास तलाव व परिसरातील जंगलव्याप्त परिसरात शोध घेतला असता, प्रवीण यांचा मृतदेह शनिवारी (दि. २) सापडला. रविवारी या परिसरात पोलिसांनी कास ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविली; मात्र प्रवीण यांच्या पत्नी नूतन तसेच श्रावणी, समृद्धी या मुलींचा शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. दरम्यान, कास परिसरात जंगली श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने नावडकर कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रवीण नावडकर यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, व्हिसेरा पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळणार का? बेपत्ता कुटुंबीयांचा तपास केव्हा लागणार, या साऱ्या अनुत्तरित प्रश्नांमुळे रायगाव परिसर आणि नावडकर कुटुंबीयांवर आघात झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सहायक फौजदार जगदाळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)