शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या मांजाने गळा कापून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: August 19, 2015 23:08 IST

फलटणमध्ये बालक ठार : बारामती तालुक्यात इसमाचा मृत्यू; पाच जखमी

फलटण : मोटारसायकलवरून आई-वडिलांसोबत जात असताना बालकाचा पतंगाच्या चायना मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना फलटण येथे बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. तसेच ढवळेवाडी येथील एका इसमाचाही याच मांजामुळे बारामती तालुक्यातील मेखळी येथे मृत्यू झाला. दरम्यान, या मांजामुळे आणखी पाचजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.उस्मान रियाज शेख (वय ६, रा. लोणंद ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रियाज शेख हे पत्नी व दोन मुलांसमवेत मोटारसायकलवरून सोमवार पेठेत आले होते. दुसऱ्या मुलाला मदरशामध्ये ठेवून ते दुपारी अडीच वाजता लहान मुलगा उस्मानला घेऊन ते घरी यायला निघाले. त्यावेळी मोटारसायकलवर उस्मान पुढे बसला होता. सोमवार पेठेमध्ये आल्यानंतर अचानक उस्मानच्या गळ्याला मांजा अडकला. मोटारसायकल थांबेपर्यंत मांजाने उस्मानचा निम्मा गळा कापला. रियाज यांच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत फार वेळ झाला होता. उस्मानच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. परंतु तरीही वडील रियाज यांनी त्याला तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी उस्मानला मृत घोषित केले. रियाज शेख हे लोणंद येथील मशिदीत इमाम म्हणून काम करतात. (प्रतिनिधी)अन् पोलिसांनी मांजा कापला ! या घटनेनंतर पोलिसांनी शहरात फेरफटका मारून पतंग उडविणाऱ्या मुलांना पतंग उडविण्यापासून परावृत्त केले. शुक्रवार पेठेतील बाणगंगा नदीकाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. काही मुले पतंग उडवित होते, त्यांचा मांजा पोलिसांनी कात्रीने कापून टाकला.महादेव केंगारही मृतढवळेवाडी, ता. फलटण येथील महादेव लक्ष्मण केंगार (वय ४५) हे आपल्या मुलासह बारामती तालुक्यात गेले होते. मेखळीकडून ढवळेवाडीला परतत असताना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पतंगाच्या मांजामुळे ते जखमी झाले. त्यांना मुलाने तत्काळ बारामतीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.