शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय जुमल्यांसाठी महिन्याचा कालावधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:53 IST

सातारा : जिल्हा बँकेची निवडणूक स्थगित झाली असली तरी राजकीय जुमल्यांसाठी आता महिनाभराचा कालावधी उरलेला आहे. या महिनाभरात महाविकास ...

सातारा : जिल्हा बँकेची निवडणूक स्थगित झाली असली तरी राजकीय जुमल्यांसाठी आता महिनाभराचा कालावधी उरलेला आहे. या महिनाभरात महाविकास आघाडी, महायुती यांचे धोरण निश्चित होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. ही बँक गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या जिल्हा बँकेत प्रवेश करण्यासाठी भाजपने रणनीती आखलेली आहे. मात्र, मर्यादित मतदारांची संख्या ही भाजपसमोरील समस्या आहे.

बँकेचे संचालक खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले यांच्या स्थानिक वर्चस्वात असलेल्या सहकारी संस्थांच्या बळावर भाजप जिल्हा बँकेत शिरकाव करण्यासाठी सज्ज आहे.

बँकेची निवडणूक पक्षांऐवजी नेत्यांभोवतीच फिरत आहेत. या चर्चेमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे हेच आघाडीवर आहेत. या नेत्यांच्या भूमिकेला निवडणुकीत विशेष महत्त्व आहे. दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनीही राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवले आहे. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव या पाच तालुक्यांत या दोन्ही नेत्यांचे बळ आहे. हे बळ राष्ट्रवादीसाठी पोषक ठरणारे आहे.

राज्यातील सत्ता हेदेखील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे शस्त्र आहे. तसेच सहकार खाते बँकेचे तज्ज्ञ संचालक बाळासाहेब पाटील यांच्याकडेच असल्याने राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढलेली आहे. सोसायटी मतदारसंघासह इतर मतदारसंघांमध्ये मंत्री पाटील यांचा प्रभाव राष्ट्रवादीला पोषक ठरणारा आहे. भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक तालुक्यातून उमेदवारीची तयारी केलेली आहे. आपल्याला पोषक असे ठरावदेखील केलेले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केलेल्या बिनविरोधच्या मोहिमेला भाजप ब्रेक लावण्याचीही शक्यता आहे. भाजपला जादा जागा वाढवून मिळणार का?, राष्ट्रवादीचे नेते काय धोरण राबविणार?, शिवसेना, काँग्रेस या पक्षांची भूमिका काय असणार? याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागलेल्या आहेत.

चौकट..

मतदार यादी प्रसिद्धी लांबणीवर

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे ठराव जिल्हा बँकेला प्राप्त झाले आहेत, त्यांची छाननी करून २ मार्चपर्यंत सहकार विभागात जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, दि. १२ मार्च रोजी ठरलेल्या कार्यक्रमानुसार मतदार यादी प्रसिद्धी होणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. शासनाने ३१ मार्चपर्यंत निवडणुकीला स्थगिती दिली असल्याने १ एप्रिलनंतरच प्रशासकीय घडामोडी होणार आहेत.

जिल्हा बँकेचा फोटो व निवडणुकीचा लोगो वापरावा