शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या विषयावर कुणीही न बोलण्याच्या मंत्र्यांना सूचना : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:06 IST

दिलेल्या तारखेनुसार सरकार कर्जमाफी देणार

कराड (जि. सातारा) : ‘राज्यात कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे. या विषयावर सभागृहात देखील चर्चा झाली असून, कर्जमाफीच्या विषयावर कुणीही बोलायचं नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सर्वांना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही कुणी यावर बोलू शकत नाही. ३० जूनची जी मुदत दिलेली आहे, त्यानुसार कर्जमाफी सरकार देणार आहे,’ अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे गुरुवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळी भेट दिली, यावेळी ते बोलत होते. रयत सहकारी कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.मंत्री पाटील म्हणाले, ‘राज्यातील सहकार खात्यावर कर्जमाफीचा किती बोजा आहे? त्याची आकडेवारी काढावी लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने एक परदेशी कमिटी नेमली आहे. ती याचा अभ्यास करणार आहे, तसेच सर्व माहिती घेणार आहे. त्यांना जेव्हा माहिती मिळेल त्यानंतर खरंच कर्जदार कोण आहे का? त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर आपल्याला देखील समजेल.

ईव्हीएम मशीन घोटाळा होऊच शकत नाहीईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत असल्याची टीका होत आहे. याबद्दल छेडले असता मंत्री पाटील म्हणाले, ‘पालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन घोटाळा झालेला नाही. मशीनमध्ये तो होऊच शकत नाही.’

English
हिंदी सारांश
Web Title : Ministers instructed to stay silent on loan waiver issue.

Web Summary : Cooperation Minister Patil stated CM instructed ministers to avoid discussing loan waivers. The government will provide waivers as per the June 30 deadline. A committee is studying the state's loan burden. Patil denies EVM fraud allegations.