शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ जल्लोषासाठीच लाखोंचा चुराडा!

By admin | Updated: September 15, 2014 00:07 IST

डॉल्बीची युवकांमध्ये ‘क्रेझ’ : इतका खर्च कशासाठी? नागरिकांतून सवाल

सचिन काकडे - सातारा  -त्यानं कुठणं आणलायं रे... याचा कितीचा? त्याचा हॅँगिंग आहे का?...आपण पण लावूया मग थरावर थर... केवळ अशा भानगडींमुळे युवकांमध्ये डॉल्बीची क्रेझ वाढली आहे. यासाठी मग लाखोंचा चुराडा झाला तरी चालेल; पण धमाका झालाच पाहिजे, अशीच काही युवा कार्यकर्त्यांची धारणा झाली आहे. केवळ ‘दणदणाटा’साठी इतका खर्च कशासाठी? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात डॉल्बीचा आवाज निवडक शहरांमध्येच घुमत होता. हळुहळू त्याचे आकर्षण वाढत गेले आणि व्याप्तीही वाढत गेली. परिणामी ग्रामीण व शहरी भागांत लग्न कार्यापासून ते सर्व धार्मिक कार्यात डॉल्बीची मागणी वाढू लागली. हे पाहून डॉल्बी व्यावसायिकांची संख्याही जिल्ह्यात वाढू लागली. जिल्ह्यात लहान-मोठे जवळपास २०० डॉल्बी व्यावसायिक आहेत. ही साउंड सिस्टिम अत्यंत महागडी असल्याने उत्सवकाळात डॉल्बीची सुपारी ही तितकीच मोठी असते. २५ हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत डॉल्बीची सुपारी घेतली जाते. काही वेळेस पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरातूनही डॉल्बी सिस्टिम आणली जाते. गणेशोत्सव काळात या डॉल्बीला प्रचंड मागणी असते. मंडळांचे ज्युनिअर कायकर्ते सिनिअर कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकत नसल्याचा सूर ‘लोकमत’ व्यासपीठात उमटला होता. ज्युनिअर कार्यकर्त्यांवर सिनिअर कार्यकर्त्यांची मदार अवलंबून असल्याने त्यांना खूश ठेवण्यासाठीच वरिष्ठांना झुकावे लागत आहे. मात्र, सातारा येथे गणेशोत्सवात घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी फक्त मोठ्या आवाजासाठी लाखोंचा चुराडा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. डॉल्बीला विरोध नाही; परंतु त्याच्या आवाजावर मर्यादा असायली हवी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.डॉल्बीवर जो-तो आपले भान विसरून थिरकत असतो. ही गरज पारंपरिक वाद्येही भागवू शकतात, मग इतरांच्या जीवाशी खेळ कशासाठी करायचा, असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.रोजगाराची चिंता निरर्थक आपण जर थोडासा विचार केला तर जाणवेल की, डॉल्बीमुळे केवळ एकाच व्यावसायिकास रोजगार मिळतो; मात्र तीच सुपारी जर पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या व्यावसायिकांना मिळाली तर अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. बॅँड-बाजा, ढोल पथकात एक नव्हे तर दहा-पंधरा जण काम करीत असतात. या वाद्यांचा आवाज जरी कमी असला तरी श्रवणीय आहे. याचे सर्वांनीच चिंतन करणे गरजचे आहे, असे असताना रोजगाराची चिंता करणे मग निरर्थकच म्हणावे लागेल.