शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिजन सातारा’ रोखणार स्थानिक युवकांचे स्थलांतर

By admin | Updated: May 21, 2015 00:12 IST

‘व्हिजन सातारा’साठी क्रिडाई, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, सातारा, बिल्डर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन सातारा शाखा, तसेच मेडिया, आयआयआयडी, आयआयए अशा विविध संस्था एकत्रित

सातारा : जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सुविधा निर्माण झाली आहे. मात्र, सुशिक्षित युवकांना नोकरीसाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर रोखण्यासाठी तसेच शहर व सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ‘व्हिजन सातारा’च्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न होणार आहेत, अशी माहिती ‘व्हीजन सातारा’चे समन्वयक कमलेश पिसाळ यांनी दिली.‘व्हिजन सातारा’साठी क्रिडाई, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, सातारा, बिल्डर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन सातारा शाखा, तसेच मेडिया, आयआयआयडी, आयआयए अशा विविध संस्था एकत्रित आल्या आहेत. मेकिंग आॅफ सातारा या विषयावर नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, निवृत्त आयकर आयुक्त अरुण पवार, टाटा सिक्युरिटजचे वरिष्ठ संचालक, अकोल्याचे नूतन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयटी तज्ज्ञ हेमंत जोशी, जाल कूपर, कर्तव्य सोशल ग्रुपच्या वेदांतिकाराजे भोसले, डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘व्हीजन सातारा २०२०’ लोगोचे उद्घाटन करण्यात आले.‘व्हिजन सातारा’च्या माध्यमातून प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून योगदान दिले तर शासन व प्रशासनाच्या मदतीशिवाय जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. उद्योगधंदे वाढले तर स्थलांतर थांबेल, यासाठी प्रयत्न होणार आहेत, असे पिसाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चार गोष्टींवर लक्ष केंद्रितखंबाटकी बोगद्याचे काम झाल्यास जिल्ह्यात नवीन उद्योग येतील. बीव्हीजीच्या माध्यमातून सुमारे ११० एकर क्षेत्रावर फूड पार्क उभे राहणार असून यामुळे दहा ते पंधरा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. सातारा हद्दवाढ, मेडिकल कॉलेज, महिला रुग्णालय यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ‘व्हिजन सातारा’ यशस्वी करण्यासाठी चार गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे पिसाळ यांनी सांगितले.