शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

सभापती बदलासाठी नेत्यांबरोबर बैठकीचा घाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राष्ट्रवादी नेतेमंडळीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद सभापतींचा वर्षाचा कालावधी संपल्याने नवीन दावेदारांच्या हालचाली वाढल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राष्ट्रवादी नेतेमंडळीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद सभापतींचा वर्षाचा कालावधी संपल्याने नवीन दावेदारांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याचबरोबर इच्छुकही वाढू लागले आहेत. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर लवकरच बैठक घेण्याचा घाट घातला असून, त्यानंतर खांदेपालटाबाबत निर्णय होणार आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी २०१७ मध्ये झाली होती. निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. सध्या पक्षाकडे ४० हून अधिक सदस्य आहेत. पहिला अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर १ जानेवारी रोजी २०२० ला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर ९ जानेवारी रोजी सभापतींची लॉटरी निघाली. झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राज्य विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह पक्ष नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर अनपेक्षितपणे कृषी सभापतीसाठी कोरेगावचे मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याणसाठी माण तालुक्यातील सोनाली पोळ आणि समाजकल्याणसाठी खटावच्या कल्पना खाडे यांचे नाव जाहीर झाले. हे जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दावेदारांची समजूत घातली होती. त्यानंतर रामराजेंनी सभापतींची नावे जाहीर करून वर्षासाठी पदे असल्याचे स्पष्ट केले होते.

पक्ष बैठकीत ठरल्याप्रमाणे विद्यमान सभापतींची मुदत संपली आहे. त्यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. या दावेदारांनी आपापल्या नेत्यांपर्यंतच सभापतीपदाची भावना पोहोचविली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण पुढे करीत काही दिवस थांबण्यास सांगितले होते. आता निवडणूक आणि मतमोजणीही पार पडली आहे. त्यामुळे दावेदारांची इच्छाशक्ती आणखी वाढली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत दावेदारांची राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होत आहे. यामध्ये राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील यांची बैठक होऊ शकते. त्यानंतरच सभापतींची खांदेपालट करायची का, यावर निर्णय होणार आहे. असे असले तरी दावेदार आता नाही तर कधीच नाही, अशा भूमिकेत आहेत. त्यामुळे निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट :

महिला, बालकल्याणसाठी तीन नावे चर्चेत...

मागीलवेळी कृषी सभापतीपदासाठी फलटणमधील धैर्यशील अनपट, समाजकल्याणसाठी पाटणमधील बापूराव जाधव आणि महिला बालकल्याणसाठी माणमधील डॉ. भारती पोळ व खंडाळ्यातील दीपाली साळुंखे यांचे नाव आघाडीवर होते; पण राजकीय हालचालींतून सर्वांनाच थांबावे लागले. आता झेडपीची निवडणूकही वर्षावर आली आहे. त्यामुळे मागील दावेदारांची नाराजी नेत्यांना दूर करावीच लागेल. त्यातच आता नवीन इच्छुकही वाढले आहेत. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील डॉ. अभय तावरे हेही सभापतीपदासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर महिला व बालकल्याणसाठी डॉ. भारती पोळ, खंडाळ्यातून दीपाली साळुंखे, जावळीतील अर्चना रांजणे यांच्या नावांचीही चर्चा सुरू झाली आहे.

....................................................................