शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मांढरदेवच्या काळूबाईचे मंदिर दर्शनासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

वाई : वाई तालुक्यातील मांढरदेव येथे काळूबाईच्या दरबारात राज्यासह परराज्यातील अंदाजे सात ते आठ लाख भाविक दरवर्षी जानेवारी महिन्यातील ...

वाई : वाई तालुक्यातील मांढरदेव येथे काळूबाईच्या दरबारात राज्यासह परराज्यातील अंदाजे सात ते आठ लाख भाविक दरवर्षी जानेवारी महिन्यातील पौष पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेला हजेरी लावून कोणी नवसासाठी, तर कोणी नवस फेडण्यासाठी येत असतात. पण दुर्दैवाने कोरोनोच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यातील २७, २८ व २९ रोजी पौष पौर्णिमेला येथे यात्रा भरणार होती.

वाई तालुक्यात मांढरदेव येथील आई काळूबाई हे पिढ्यानपिढ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवीची जानेवारी २७, २८ व २९ रोजी पौष पौर्णिमेला होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन रद्द करण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश व निर्देशानुसार आई काळूबाईच्या यात्रेतील धार्मिक विधी, पूजा, अर्चा रूढी-परंपरेनुसार स्थानिक पातळीवरील देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी समांतर अंतर व सॅनिटायझर, मास्क वापरून कोरोनोबाबत फैलाव न होण्यासाठी योग्य ती काळजी घेऊन करावी, अशी सूचना वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी सोमवारी मांढरदेव येथे बैठक घेऊन दिली आहे.

यावेळी तहसीलदार रणजित भोसले, पोलीस उपविभागीय अधिकारी शीतल खराडे, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे हे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. २७ व २८ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेला येथील यात्रा भरत असते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यातील बहुतांश यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने मांढरदेव येथील यात्रा पूर्व नियोजन बैठक घेऊन मंदिर पुजारी, स्टाॅलधारक व मांढरदेव ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्टी यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे वाई तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.

चौकट..

पै-पाहुण्यांना बोलावू नये...

दरवर्षी यात्रेसाठी बाहेरगावाहून येणारे व्यावसायिक, दुकानदार मांढरदेव गावात येणार नाहीत व मांढरदेवसह परिसरातील यात्रा निमित्ताने पै-पाहुण्यांना बोलावू नये. त्यादृष्टीने दुकानदार व परिसरातील सर्व गावांतील ग्रामस्थांनी व मांढरदेव ग्रामस्थांनी काळजी घ्यावयाची आहे, अशा सूचनाही यावेळी प्रांताधिकारी यांच्यामार्फत देण्यात आल्या. या बैठकीला वाई पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे प्रशांत शिंदे, मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे सचिव खामकर, मांढरदेव तलाठी शिंदे, ग्रामसेवक पिसाळ, पोलीस पाटील जयश्री मांढरे उपस्थित होते.