शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज!

By admin | Updated: July 16, 2014 22:54 IST

वाई, जावळी, फलटण, महाबळेश्वर, पाटण अन् खंडाळा राष्ट्रवादीकडे जाणार

सातारा : जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सभापतींच्या अखेरच्या अडीच वर्षांसाठी आरक्षण सोडतीत सात ठिकाणी महिलाराज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर माण आणि कोरेगावला काँग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ समसमान असल्याने तेथे चिठ्ठीद्वारे, तर वाई, खंडाळा, पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि फलटण पंचायत समित्यांची सत्ता एकहाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील, असे चित्र आहे.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आज, बुधवारी दुपारी एकला सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., ‘महसूल’चे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. आज जाहीर केलेले आरक्षण हे दि. १४ सप्टेंबरपासून शेवटच्या अडीच वर्षांसाठी असणार आहे. वाई पंचायत समितीचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते; पण या ठिकाणी सदस्य नाही. त्यामुळे वाईतील आरक्षण ‘ओबीसी’कडे गेले. साताऱ्यात शेवटची अडीच वर्षे सत्ता खासदार उदयनराजे भोसले गटाकडे राहणार आहे. ‘सर्वसाधारण महिला’ यासाठी नागठाणे गणातील विश्रांती साळुंखे यांची सभापतिपदी वर्णी निश्चित मानली जात आहे. खटाव पंचायत समिती सभापती निवडीच्यावेळी राष्ट्रवादीचे बलाबल असेल; परंतु अनिश्चितता असणार आहे. या निवडीत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व सुरेंद्र गुदगे यांच्या भूमिकेवर बरेच काही अवलंबून असणार आहे. पाटण पंचायत समितीत शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाचे समान सदस्य आहेत. मात्र, आताच्या आरक्षणानुसार देसाई गटाकडे ओबीसी महिला सदस्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा सभापती बिनविरोध होईल, असे संकेत आहेत. (प्रतिनिधी)