बामणोली : कास पुष्प पठारावर फुलांचा हंगाम होण्यास यंदा दोन ते तीन आठवड्यांचा विलंब झाला असला तरी आता ती प्रतीक्षा संपली आहे. पठारावर सोनकी आणि तेरड्याची फुले फुलण्यास प्रारंभ झाला असून ही फुलांची नक्षी लक्ष वेधून घेत आहे.यंदा मान्सूनने उशिरा केलेली सुरुवात आणि पुढे पडत राहिलेली संततधार यामुळे कासच्या पुष्प पठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यासही उशीर झाला. गेल्या आठवड्यात यवतेश्वर परिसरात रस्त्यालगत सोनकीची पिवळी फुले फुलण्यास प्रारंभ झाला आणि आता कास पठारावरही फुललेली तेरड्याची जांभळी मनमोहक फुले लक्ष वेधून घेत आहेत. गणेशखिंड परिसरातील माळावर पसरलेली सोनकी फुलांची पिवळी शाल चित्त वेधून घेत असल्यामुळे शनिवारी, रविवारी कासकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या हजारो गाड्या येथे थांबलेल्या दिसत होत्या. पावसाने उघडीप दिल्याने पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. सुमारे ४० ते ४५ ट्रॅव्हल्स व दुचाकीवरून आलेल्या अनेकांनी कास पठार, भांबवली धबधबा, बामणोली शिवसागर जलाशय परिसरात गर्दी केली होती. (वार्ताहर)पार्किंग व्यवस्थेचा बोजवारापठारावर येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगचे योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे रस्ता ओलांडताना व इतर वाहनांना जागा देताना अडचण निर्माण होते. शनिवारी सायंकाळी कास तलावाच्या भिंतीजवळ ट्रॅव्हल्स रस्त्यावरच बंद पडली. त्यामुळे दोन तास वाहतूक बंद होती. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ट्रॅव्हल्स ढकलून बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरू झाली.
‘कास’वर तेरड्याच्या फुलांची मनमोहक नक्षी
By admin | Updated: September 15, 2014 00:08 IST
प्रतीक्षा संपली : फुलांचा हंगाम सुरू झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी
‘कास’वर तेरड्याच्या फुलांची मनमोहक नक्षी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}