शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मदनराव मोहितेंचा टोला : अदृश्यबाबा आता गावोगावी दिसू लागलेत; इंद्रजित मोहितेंचाही

By admin | Updated: April 3, 2015 00:44 IST

मदनराव मोहितेंचा टोला : अदृश्यबाबा आता गावोगावी दिसू लागलेत; इंद्रजित मोहितेंचाही घणाघात

कऱ्हाड : ‘यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना एक डॉक्टर चालवतात, तर इंजिनिअर का चालवू शकत नाही? असा सवाल करत कृष्णेची सत्ता हस्तगत केली. पण, या हुशार इंजिनिअरने ठेकेदारीप्रमाणे कारखाना चालवायला एक ‘गडी’ ठेवलाय. कृष्णेचा सभासद हा कारखान्याचा मालक असताना आज मालकापेक्षा गडीच शिरजोर झाला आहे,’ असा घणाघात माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी केला. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमधील मोहिते गटाचा प्रचार शुभारंभ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व कृष्णेचे माजी संचालक प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी होते. सातारा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, कऱ्हाड पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र बामणे, कारखान्याचे विद्यमान संचालक जयवंत सावंत, माजी संचालक हणमंतराव पाटील, दीपक पाटील, अजित थोरात, मानसिंंग पाटील, आनंद मलगुंडे, सुरेश पवार, संपतराव थोरात, अशोकराव पाटील, डॉ. अशोक वेदपाठक, राजेंद्र चव्हाण, अ‍ॅड. नरेंद्र पाटील, शिवाजी मोहिते, आदित्य मोहिते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मदनराव मोहिते म्हणाले, ‘कृष्णेत निवडणुकीची चाहूल लागताच गेली पाच वर्षे ‘अदृश्य’ असणारे एक ‘बाबा’ आता गावोगावी फिरू लागले आहेत. ‘कृष्णा’ आपणच वाचवू शकतो, याचा साक्षात्कार त्यांना झालाय म्हणे. खरेतर ज्यांना स्वत:च्या खासगी कारखान्याकडे जायला वेळ मिळत नाही, ते हा कारखाना काय दुरुस्त करणार? ते कारखान्याचे जेव्हा अध्यक्ष होते, तेव्हा सायंकाळी सहा वाजता कारखान्यावर यायचे. आता हा ‘अदृश्यबाबा’ रात्रीचे कारखान्यावर येऊन तुमचे काय भले करणार ? असा सवाल करत त्यांनी भोसलेंनाही निशाण्यावर घेतले. माणसाला गुरू चांगला मिळाला की, संस्था चांगली चालते. मला यशवंतराव मोहितेंसारखा चांगला गुरूमिळाला. म्हणून मी तुम्हाला दहा वर्षांचा सुवर्णकाळ देऊ शकलो; पण त्याच भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्यांनी स्वत:च्या मालकीचा ‘कृष्णा उद्योग समूह’ स्थापन केला आणि सहकारी संस्थेत राजकारणाचे बीज रोवले. १९७२ मध्ये आबासाहेब मोहिते यांचा ‘कृष्णे’च्या निवडणुकीतील अर्ज अडीच दिवस कायद्याचा कीस काढून जयवंतराव भोसलेंनीच बाद केला आणि आज त्यांचे वारस कारखान्यात राजकारण आम्ही आणले, असा आरोप करतात. आपल्याला दुसऱ्याला शहाणपण सुचविण्याचा अधिकार आहे का, हे त्यांनी अगोदर तपासून पाहावे.’ ‘सहकारात खुले सभासदत्व देण्याचा महत्त्वपूर्ण पायंडा यशवंतराव मोहितेंनी कृष्णेत घालून दिला; पण १३ हजार ५२८ सभासदांच्या हक्कावर गदा घालणाऱ्या भोसलेंना आज १८ हजार थकबाकीदार सभासदांचा कळवळा येतोय, हा विपर्यास नाही का ? आम्ही सभासदत्व रद्द करणारे नव्हे, तर सभासदांना मालक बनविणारी मंडळी आहोत. लांडी, लबाडी करूनच भोसलेंनी आपल्याला दोनदा फसवले आहे. यंदा त्यांच्या लांड्या-लबाड्यांना बळी पडू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, ‘आम्ही जमीन गोरगरिबांना कसायला देणारी माणसे आहोत. यशवंतराव मोहितेंनी स्वत:ची १८ एकर जमीन गोरगरिबांना दान केली; पण जमिनी लाटणाऱ्यांच्या नादाला लागून आम्हाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आज रचले जात आहे. मी यशवंतराव मोहितेंचा मुलगा आहे. हीच माझी मोठी श्रीमंती आहे. मला विरोधकांसारखे पैसे लाटून मोठे होण्याची गरज नाही. मी मोठाच आहे, कारण मी भाऊंचा वारसदार आहे. (प्रतिनिधी)तोच तर त्यांचा धंदा आहे कृष्णा कारखान्याच्या जीवावर भोसलेंनी अनेक खासगी संस्था सुरू केल्या. आज ते त्याला कृष्णा उद्योग समूह म्हणतात; पण तो त्यांचा धंदा आहे. आता त्यांनी उगाच लोकांना सहकाराचे धडे शिकविण्यापेक्षा त्यांनी शिक्षणाचा धंदा केलेलाच बरा राहील, असा टोला मदनराव मोहितेंनी भोसलेंना लगावला. साठवलेल्या पैशातून चंगळ केलीआम्ही कृष्णेत साठवलेल्या पैशातून सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीच्या दोन वर्षांत खूप चंगळ केली. स्वकर्तृत्व नसतानाही चांगला दर देण्याचे ढोंग केले; पण त्यांच्या या ढिसाळ कारभारामुळे आज सभासदांच्या नशिबात मंगळ आला आहे. आणि तो दूर करण्यासाठी सुज्ञ सभासदांनी एकसंध होण्याची गरज आहे. मी डॉक्टर आहे. माणूस आजारी पडल्याशिवाय माझ्याकडे येत नाही, आणि मी त्याला बरा केल्याशिवाय सोडत नाही. त्याला कारखानाही अपवाद नाही. तुम्ही काळजी करू नका एकदा आजारी कारखाना आपल्याकडे आला की त्याला बरे करण्याची खात्री डॉ. इंद्रजित मोहितेंनी यावेळी सभासदांना दिली.