शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या व्यवस्थेने वाहनधारक हतबल...!

By admin | Updated: July 16, 2015 20:40 IST

पार्किंगचा प्रश्न गंभीर : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा वाहतूक शाखेचा प्रस्ताव...

सातारा : वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत शहराची पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे. वाहने जास्त अन् जागा कमी अशा तुटपुंज्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहनधारक फारच हतबल झाले आहेत. ही पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा प्रस्ताव पालिकेला दिला आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून राजवाडा व पोवई नाका या परिसराला पाहिले जाते. याठिकाणी जिल्ह्यातील नागरिक बाजारासाठी येतात. त्यामुळे येथे सतत वाहनांची वर्दळ असते. वाहने लावायला जागा नसल्याने काहीजण फूटपाथवर वाहने लावतात, तर काही मंडळी डबल पार्किंगमध्ये वाहने लावतात. त्यामुळे त्यांना अनेकवेळा वाहतूक पोलिसांच्या क्रेनचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलीस व पालिकेने पार्किंगसाठी शहरात सम-विषम तारखेनुसार पार्किंग व्यवस्था केली आहे. परंतु, ज्या पार्किंग व्यवस्थेतही अनेक वाटेकरी आहेत. या पार्किंगमध्ये दुकानात जाण्या-येण्यासाठी अडगळ (लोखंडी जाळी) टाकली जाते. तर काही विक्रेते पार्किंगमध्येच दुकाने थाटतात, तर अनेक फिरते हातगाडेधारक पार्किंगच्या जागेवरच हातगाडे लावून विक्री करतात. त्यामुळे मुळात पार्किंग अपुरे आणि त्यात या वाटेकऱ्यांमुळे वाहनधारकांना पार्किंग करायला जागाही मिळत नाही. अनेकदा पार्किंगचे नियम मोडून वाहने पार्क केली जातात व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.बाजाराचा दिवस, गणपती, दुर्गोत्सव, दिवाळीला तर पार्किंगचा मोठा ताण पडत आहे. यामुळे वाहनधारक व वाहतूक पोलिसांत नेहमीच वाद होतो. यावर पर्याय म्हणून शहरातील प्रमुख बाजारपेठेत ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ करावे, असा प्रस्ताव वाहतूक, पालिका व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे वाहतूक निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी सांगितले.डबल व फूटपाथ पार्किंगवाले सावधान!पार्किंगला जागा अपुरी पडत आहे. यासाठी अनेक वाहनधारक चक्क डबल पार्किंग करतात, तर अनेकजण फूटपाथवर पार्किंग करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे. यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने वाहनधारकही बिनधास्त पार्किंग करतात; परंतु आता डबल व फूटपाथवर पार्किंग करणाऱ्यावरही वाहतूक शाखा क्रेनने वाहन उचलणार आहे. त्यामुळे या वाहनधारकांनाही आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आधी पार्किंग व्यवस्था मग दंड...शहरात वाहने लावायला जागा नाही. नो पार्किंगमध्ये वाहने उचलली जातात. त्यामुळे आधी योग्य ती पार्किंग जागा आम्हाला द्या, व नंतरच क्रेनने उचला.- विकास धुमाळ, वाहनचालक