शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा आज सायंकाळी स्नेहमेळावा

By admin | Updated: May 14, 2015 23:56 IST

सहा ते नऊची वेळ : ‘राधिका पॅलेस’च्या हिरवळीवर लाभणार मान्यवरांची उपस्थिती

सातारा : ‘जिल्ह्यातील समाजमनाचा आरसा’ असा लौकिक प्राप्त केलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीच्या नववा वर्धापनदिन दि. १५ रोजी थाटामाटात साजरा होत आहे. या निमित्ताने हॉटेल राधिका पॅलेस येथे शुक्रवारी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित केला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधायक प्रयत्नाचा सन्मान करीत, विजिगीषू वृत्तीच्या प्रत्येक यशस्वी सातारकराच्या नावाचा उद््घोष करीत आणि प्रत्येक विघातक शक्तीवर कठोर प्रहार करीत ‘लोकमत’ची सातारा आवृत्ती दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. जिल्ह्याची परिपूर्णतेकडे वाटचाल व्हावी, हा हेतू ठेवून ‘लोकमत’ने मावळत्या वर्षातही अनेक उपक्रम राबविले. केवळ बातमी देऊन न थांबता बातमीमागची बातमी शोधण्याचा प्रयत्न करून अचूक विश्लेषण सातारकरांसमोर ठेवले. ही विश्लेषणे, भाकिते आणि ठोकताळे अचूक ठरल्याने ‘लोकमत’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे.संकटग्रस्त आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना सातारकरांच्याच सहकार्यातून आधार देण्याचे काम याहीवर्षी ‘लोकमत’ने केले आहे. दुर्धर आजाराने रुग्णालयात तळमळणारे लहानगे जीव, ऐन सणासुदीच्या दिवशी भिंत कोसळून मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तीचे अभागी कुटुंबीय, झोपडपट्टीत थंडीने कुडकुडणारी मुले अशा साऱ्यांनाच सातारकरांनी मदत केली आणि अशा प्रत्येक वेळी पुढाकार घेतल्याने ‘लोकमत’ खऱ्या अर्थाने ‘माध्यम’ ठरला. जलप्रदूषणाचा विषय हाताळताना गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींसाठी ‘लोकमत’ने आग्रह धरला आणि त्यासाठी सर्व संबंधित घटक आणि यंत्रणांकडे पाठपुरावाही केला. परिणामी मातीच्या मूर्तींचे प्रमाण, कमी उंचीच्या मूर्तींचे प्रमाण आणि घरच्या घरी विसर्जन करण्याचे प्रमाण अनेकपटींनी वाढले.रात्री-बेरात्री एकट्याने बाहेर पडणे ज्यांच्या नशिबी येते, अशा महिलांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन आणि अशा महिलांना येणारे अनुभव लोकांसमोर आणण्यासाठी ‘लोकमत’च्या तीन धडाडीच्या महिला पत्रकार धोका पत्करून उत्तररात्री बाहेर पडल्या आणि त्यांना आलेले थरारक अनुभव ‘लोकमत’ने मांडले, तेव्हा वाचकांचा विश्वास शतगुणित झाला. लहान मुलांना बिनदिक्कत दारू विकणाऱ्या दुकानदारांना, बारमालकांना ‘लोकमत’ने कॅमेराबद्ध केले, तेव्हाही स्तिमित झालेल्या सातारकरांनी अशाच प्रकारे भरभरून प्रतिक्रिया दिल्या. या शिदोरीच्या जोरावर दहाव्या वर्षात अधिक जोमाने काम करण्यास ‘टीम लोकमत’ सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)‘हेल्दी सातारा’ची भेटवर्धापनदिनानिमित्त यावर्षी ‘लोकमत’तर्फे ‘हेल्दी सातारा’ हा विशेषांक प्रकाशित होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी आहोरात्र राबणारे जिल्ह्यातील डॉक्टर उत्तम आरोग्याचा कानमंत्र या विशेषांकाच्या माध्यमातून देणार आहेत. तसेच सातारकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अनेक व्यक्ती या विशेषांकातून वाचकांशी संवाद साधणार आहेत.