शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पाटणच्या ‘ज्योती’ची तेजाळली गोव्यात किरणे!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

ग्रामस्वच्छतेचे धडे : निसरे येथील सुर्वेची ‘यशदा’मार्फत राज्य प्रशिक्षक म्हणून निवड -- गुड न्यूज

अरुण पवार- पाटण --सतत लोकांसाठी धडपडत राहण्याची स्वभाववृत्ती व हास्य चेहऱ्याने बोलकेपणाची सवय असलेल्या पाटण तालुक्यातील निसरे गावच्या ज्योती सुर्वे हिने पुण्यातील यशदा संस्थेद्वारे राज्य प्रशिक्षक म्हणून गोव्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये जाऊन तेथील लोकांना, राज्याचा निर्मल ग्राम पॅटर्न सांगण्याचे धडे दिले. ज्योतीची ही कामगिरी एक महिला म्हणून नक्कीच कौतुकास्पद आहे. यशदा संस्थेने शासकीय अधिकारी, मंत्री, पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. त्या संस्थेत २००९ सालापासून एक परफेक्ट व्यक्तिमत्त्व म्हणून निसरे येथील ज्योती सुर्वे हिची निवड झाली आहे. ज्योती आता राज्य प्रशिक्षक म्हणून नुकतीच गोव्यातील राशेल, वेळगे, इब्राहमपूर, ख्वाडा या गावांत जाऊन तेथील लोकांना ‘आदर्श ग्राम’ योजनेचे प्रशिक्षण देऊन परतली आहे. चौदा वित्त आयोग आणि संसद आदर्श ग्राम योजना या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यात सुमारे वीस दिवस ज्योती गोव्यातील गावांना भेट देत होती. शासकीय यंत्रणा व आमदार, खासदार यांची मोलाची मदत मिळाल्याचे ती सांगते. महाराष्ट्रभर राबविलेल्या शौचालय चळवळ, अंगणवाडी प्रकल्प, ग्रामस्वच्छता याची प्रात्यक्षिके दाखवून त्याचा अहवाल यशदामार्फत गोवा सरकारला सादर करण्याचे काम ज्योती सुर्वे व तिच्या पथकाने केले आहे. गोव्यातील हायटेक संस्थेचा अनुभव पाटणसारख्या दुर्गम भागातून गेलेल्या ज्योती सुर्वेची वक्तृत्वावर चांगली पकड असून, इंग्रजी, हिंदी भाषेवर तिचे प्रभुत्व आहे. त्यामुळे गोवा इन्स्टिट्यूट आॅफ डायरेक्टर जनरल पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन रूरल डेव्हलपमेंट (गिफाड) या संस्थेतील मॅक्यू सॅमुअल, जी. पी. पिलानेकर, विमा फर्नांडीस, सरिता पाटील या लोकांचा सहवास तिला मिळाला. गोव्यातील खासदार शांताराम नाईक, आमदार रिझनल फर्नांडीस यांच्या मतदारसंघातील दक्षिण गोव्यामधील गावांमध्ये ट्रेनर म्हणून जाऊन ज्योती सुर्वे हिने पंचायत राज गोवा अभियानात भाग घेतला. मुळातच निसरे येथे असताना मी क्रांतिज्योती नावाची सामाजिक संस्था उभारून तालुक्यातील गुंजाळी गावांसाठी रस्ते, पिण्याच्या पाण्याची योजना, शिक्षण यासाठी काम केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट झाली. त्यांची प्रेरणा घेऊनच मी आज यशदामध्ये काम करते.- ज्योती सुर्वे