शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कासवर जाताना परवाना हवाच

By admin | Updated: September 20, 2014 00:35 IST

नियमावर बोट : वाहतूक पोलिसांची करडी नजर

सातारा : जागतिक वारसास्थळ असलेल्या कासवर जाताना आता परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या हंगामातील फुले बघण्यासाठी पर्यटकांची रीघ आता कास पठाराच्या दिशेने वळू लागली आहे. पठारावर जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांची काटेकोरपणे तपासणी सध्या वाहतूक विभाग करत आहे.सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहराच्या पश्चिमेकडील कास पठाराला तर जागतिक वारसास्थळ म्हणून जागतिक दर्जा मिळाला आहे. साधारण सप्टेंबर -आॅक्टोबर मध्ये येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. जिल्हा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची रीघही यात मोठी असते.लक्झरी किंवा खासगी बस यांनी प्रवासी घेऊन जाताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून तात्पुरता परवाना घेणे बंधनकारक आहे. तरीही अनेक वाहतूकदार हा परवाना न घेता कर चुकवून बिंधास्त प्रवासी वाहतूक करतात. यामुळे प्रवाशांबरोबर शासनाचीही फसवणूक केली जात आहे. हा परवाना वाहनाच्या सीटनुसार आकारला जातो. हा परवाना मिळण्यासाठी महिनाभर अथवा आदल्या दिवशीही काढला जाऊ शकतो. या कराची रक्कमही प्रवाशांकडूनच तिकिटाच्या रूपात घेतली जाते. त्यामुळे प्रवाशांची फसवणूक होत आहे.दरम्यान, गत सप्ताहापासून पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. अनेकजण जिल्ह्याबाहेरून लक्झरी व खासगी बसमधून या ठिकाणी येत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक पोलिसांनी मागील काही दिवसांपासून ही तपासणी सुरू केली आहे. नियमात न बसणाऱ्या किंवा कर बुडविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. (प्रतिनिधी)आरटीओ चा गचाळ कारभारकोणतेही पर्यटकांचे वाहन साताऱ्यात दाखल होणार असेल, तर त्यासाठी आवश्यक परवाना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून घेतला जातो. परवाना घेऊन जाताना प्रवास करणाऱ्या सर्वांची नावे कागदावर लिहून देऊन त्याची नोंद करावी लागते. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या हातातील अतिरिक्त काम लक्षात घेता, हे कर्मचारी परवान्याचा शिक्का मारतात; पण प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे नावे मात्र कागदावर लिहीत नाहीत. त्यामुळे नेमके कोण प्रवास करत आहे, याची कोणतीच अधिकृत माहिती प्रशासनाकडे उपलब्ध राहत नाही.पर्यटक अनभिज्ञ...!कास पठारावर जाताना असा काही परवाना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून घ्यावा लागतो, याविषयी पर्यटकांना या गोष्टीची माहिती नसते किंवा काहीदा कुठे इतकी झगझग करा म्हणून काही वाहनचालक हा परवाना घेणे टाळत आहेत. असा परवाना न घेणाऱ्यांना एक हजार ते पाच हजारांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. परवाना चुकविणाऱ्या वाहनाची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. एक वाहन तपासायला साधारणत: अर्धा ते एक तास लागतो. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांना तपासणी होईपर्यंत गाडीत ताटकळत बसावे लागते.