शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर बिबट्याचा पंधरा मिनिटे ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेकवेळा बिबट्याने प्राणी ठार केले आहेत. गत काही महिन्यांत चचेगाव, आगाशिवनगर, जखीणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील ...

आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेकवेळा बिबट्याने प्राणी ठार केले आहेत. गत काही महिन्यांत चचेगाव, आगाशिवनगर, जखीणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे या परिसरात किमान महिन्यात तीन-चारवेळा बिबट्याचा हल्ला होण्याचे समीकरणच झाले आहे. काही ठिकाणी झालेला हल्ला हा एका बिबट्याचा नसून, जास्त बिबट्यांचा असावा, असा अंदाज वनविभागाने अनेकवेळा वर्तविला होता.

काही दिवसांपूर्वी जखीणवाडी, चचेगाव येथील टाकेवस्तीनजीक ढेबवस्तीवर, आगाशिवनगर येथील पवार वस्तीवर हल्ला करत त्याने शेळ्या ठार केल्या होत्या. धोंडेवाडीतील लिक नावाच्या शिवारात म्हैस ठार केली होती. दुसऱ्याच दिवशी काले येथील शेतकऱ्यांना बंद कंपनीच्या परिसरात भरदिवसा बिबट्या फिरत असल्याचे दिसले होते. डोंगरभागात बिबट्याचा सततचा वावर पाहता परिसरातील शेतकरी रानात जाण्यासाठी धजावत नाहीत. काही दिवसांपूर्वी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काले येथील संतोष पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य घरात होते, तर दारात बसलेल्या पाळीव श्वानावर हल्ला करण्यासाठी बिबट्या तेथे आला होता. मात्र, श्वानाने केलेल्या गोंधळामुळे व भुंकण्याने बिबट्याने धूम ठोकली.

मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पाचवडफाटा येथे महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसल्यावर बिबट्याने महामार्गावरच ठिय्या मारला. तब्बल पंधरा मिनिटे तो एका जागेवरच बसून होता. बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. जमलेल्या नागरिकांनी पोलिसांसह वनविभागाला खबर दिली. वनविभागासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने उसाच्या रानात धूम ठोकली. यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. भरवस्तीत वावर वाढल्यामुळे बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

- चौकट

वाहनांची वर्दळ सुरूच

महामार्गावर बिबट्याने ठाण मांडलेले असताना त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच महामार्गावरून वाहनांची रहदारीही सुरू होती. एकीकडे बघ्यांची गर्दी, तर दुसरीकडे वाहनांची वर्दळ यामुळे काही वेळानंतर बिबट्या बिथरला. त्याने गतीने महामार्ग ओलांडून उपमार्गावरून थेट उसाच्या फडात झेप घेतली. क्षणार्धात तो दिसेनासा झाला.