शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांचा कस!

By admin | Updated: July 16, 2015 20:43 IST

देसाई-पाटणकर गटांत लढत : नवीन वॉर्डरचनेमुळे सदस्यसंख्याही वाढणार

तारळे : पाटण तालुक्याचे लक्ष लागलेल्या तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ येऊ लागली आहे. गावातील राजकीय वातावरणही त्यामुळे ढवळून निघत आहे. अनेक ठिकाणी एका जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने नाराजी दूर करीत बंडखोरी टाळून सक्षम उमेदवार निवडण्यासाठी नेतेमंडळींचा कस लागत आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून माघारी घेईपर्यंत ‘कोण कितने पानी में’ हे सांगणे मुश्किल झाले आहे. तालुक्याच्या राजकारणात एक संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून तारळे ग्रामपंचायत ओळखली जाते. तारळे गावाला देसाई गटाचा बालेकिल्ला समजला जात असताना गतवेळी पाटणकर गटाने ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांनी ताबा घेतला. देसाई-पाटणकर गटांत सरळ लढत होत आहे. गतवेळी पाटणकर गटाबरोबर असलेला एक गट देसाई गटात दाखल झाल्याने सत्ता अबाधित राखण्यासाठी पाटणकर गट तर सत्तेच्या चाव्या पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी दोन्ही गटांकडून वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. एकूण पाच वॉर्ड मिळून पंधरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत यंदा एक नवीन वॉर्ड तयार झाला आहे. त्याठिकाणी दोन सदस्य संख्या वाढल्याने आत एकूण सतरा सदस्यांची संख्या ग्रामपंचायतीवर होणार आहे. काही ठिकाणी वॉर्डरचनेत कोणाला फायदा, कोणाला तोटा होतो, याचे चित्र काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. उमेदवार चाचपणी, इच्छुकांची माहिती घेण्यासाठी गुप्त बैठका होऊ लागल्या आहेत. कोणाचे कुठे व किती वजन आहे. याची शहानिशा करून उमेदवारी चाचपणी करण्यात येत आहे. तसेच इच्छुकांची संख्या वाढत असल्याने एकमेकांची समजूत काढणे नेते मंडळींची डोकेदुखी ठरणार आहे. एकदम अटीतटीच्या होणाऱ्या लढतीत दोन्ही गटांकडून ग्रामपंचायतीवर आपलाच ताबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी अर्ज भरण्याची मुदत आली तरी उमेदवारीचा घोळ मिटताना दिसत नाही. एका जागेवर एका पेक्षा जास्त उमेदवार दावा सांगत असल्याने नाराजांची नाराजी दूर करून बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी नेतेमंडळी सावध पावले टाकत आहेत. निवडणूक प्रचारात पाटणकर गटाकडून विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात येईल, तर देसाई गटाकडून मात्र पाटणकर गटाने विरोधात असताना केलेल्या आश्वासनांची पूर्तता या पाच वर्षांत केली का? हा मुख्य मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. यासह अनेक मुद्द्यांवर ग्रामपंचायतीचा प्रचार रंगणार आहे. देसाई-पाटणकर गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून, मतदारच कोणाची जागा कुठे आहे, हे दाखवून देणार आहेत. कोणी कितीही उर बडवला तरी थोड्याच दिवसात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. (वार्ताहर)बेरजेचे राजकारण...वॉर्डावॉर्डातून गुप्त बैठका घेऊन मतदारांचे कौल, उमेदवारांची चाचणी सुरू आहे. यंदाची निवडणूक म्हणावी एवढी सोपी नसल्याने गावातील नेतेमंडळी बरोबरच वरिष्ठ नेत्यांनी सुध्दा तारळे ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालून बेरजेची गणिते आखली आहेत.