शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नेते घरात, धरणग्रस्त मात्र ऊन्हात

By admin | Updated: May 12, 2015 23:41 IST

वयोवृद्ध आंदोलकांचे सुरू आहेत हाल : कुडकुडत काढली शनिवारची संपूर्ण रात्र

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन संदर्भातील मागण्यांसाठी जिल्ह्यातील धरणग्रस्तांनी ६ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रविवारी आंदोलनाच्या ३५ व्या दिवसांपर्यंत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. वयोवृद्ध धरणग्रस्तांचे आंदोलनस्थळी प्रचंड हाल सुरू आहेत. अंगाची लाहीलाही करणारे ऊन, तर अधूनमधून विजेच्या कडकडाटासह येणारा जीवघेणा पाऊस धरणग्रस्तांना मरणाच्या दारात उभा करीत आहे. शासनकर्ते मंत्रालयात, धरणग्रस्तांचे नेते घरात, तर बिचारे धरणग्रस्त मात्र आंदोलनस्थळी ऊन-पावसात रात्री जागून काढीत आहेत.राज्यातील सुमारे ११ तालुक्यांमधील धरणग्रस्तांचे विविध ठिकाणी गेल्या ३५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढेही जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० धरणग्रस्त श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनासाठी बसले असून, त्यात वयोवृद्ध, पुरुष व महिलांचा समावेश आहे. पुनर्वसनासंदर्भातील दीर्घ काळापासूनच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन सुरू असून, शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले होते. राज्यात इतर ठिकाणी सुद्धा याचप्रकारे युती शासनातील मंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन दिले. मात्र, आजअखेर मुख्यमंत्र्यासमवेत बैठक झाली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांपुढे आंदोलनांशिवाय दूसरा पर्याय ऊरलेला नाही. धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे शासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात असला तरी शासनकर्त्यांवर त्याचा काहीही व कोणताही परिणाम होताना सध्यातरी दिसत नाही. (प्रतिनिधी)धरणग्रस्तांना किती दिवस वेठीस धरणार?धरणग्रस्तांच्या हितासाठीच हे आंदोलन सुरु असले तरी वयोवृद्ध धरणग्रस्तांना किती दिवस वेठीस धरणार असा सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. शनिवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने पोटात भीतीचा गोळा यावा, अशी भयानक परिस्थिती निर्माण केली होती.केवळ रस्त्यावर अडकलेल्यांच्याच नव्हे तर घरात असणाऱ्या नागरिकांच्याही अंगावर काटा उभा राहिला होता. अशा परिस्थितीत धरणग्रस्त मात्र आंदोलनस्थळी बसून होते. मध्यरात्रीपर्यंत विजेचे लोळ, आकाशात दिसत होते. पाऊस सुद्धा सुरू होता. अशा भीतीदायक वातावरणात धरणग्रस्तांनी आंदोलनस्थळी कुडकुडत रात्र काढली. ज्यांनी न्याय द्यायचा ती राज्यकर्ती मंडळी मंत्रालयात किंवा त्यांच्या अलिशान निवासस्थानी बसून असतील. धरणग्रस्तांचे नेते सुद्धा त्यांच्या घरात बसून राहतात.धरणग्रस्तांसमवेत त्यांनी एखादी रात्र, आंदोलनस्थळी बसून कधीही काढल्याचे ऐकीवात नाही. धरणग्रस्तांना मात्र ऊन-पावसात जीव मुठीत घेऊन आंदोलनस्थळी दिवस ढकलावे लागत आहे.ं