शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याची भूमी चळवळींची : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

सातारा : सातारा ही चळवळींची भूमी असून, समाजहिताची तळमळ असलेले कार्यकर्ते या भूमीत घडले. १७० वर्षांपूर्वी मुलींसाठी शिक्षणाची दारे ...

सातारा : सातारा ही चळवळींची भूमी असून, समाजहिताची तळमळ असलेले कार्यकर्ते या भूमीत घडले. १७० वर्षांपूर्वी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे माहेरघर असल्यामुळे स्त्री मुक्तीची आणि सक्षमीकरणाची चळवळही साताऱ्यात रूजली, असे उद्‌गार ज्येष्ठ अभिनेते नंदकुमार पाटील यांनी काढले.

येथील लेक लाडकी अभियानच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले संघर्ष पुरस्कारांचे वितरण अभिनेते पाटील आणि डॉ. विजया चिंडक यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सावित्री उत्सवात ‘पंख फुटलेली मुलगी’ हा सत्यघटनेवर आधारित चित्रपट दाखविण्यात आला. कैलास जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सोनाली बडे या मुलीचा बालविवाह झाल्यानंतरचा संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिनेच स्वत:ची भूमिका साकारली असून, दीपेन्ती चिकणे, शशी गाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

वैद्यकीय पेशा सेवाव्रत म्हणून स्वीकारलेल्या आणि जनजागृतीच्या सातत्यपूर्ण कार्यासह कोरोनाकाळात अविरत सेवा बजावणाऱ्या पनवेलच्या डॉ. मेघा देशपांडे आणि स्त्री मुक्तीच्या आंदोलनात प्रसंगी धोके आणि तुरुंगवास पत्करून प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या सातारच्या अ‍ॅड. शैलजा जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर सामान्यातील असामान्य म्हणून एकूण चार व्यक्तींचा आणि दोन संस्थांचा गौरव करण्यात आला. त्यात अंगणवाडीला आयओएस प्रमाणपत्र मिळविणाऱ्या सावली येथील अनुजा साळुंखे, कोरोनाकाळात अखंड कार्यरत असलेले सातारा कोविड डिफेन्डर्स ग्रुपचे विनीत पाटील, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करणारे सचिन सोनावणे, गोधडी शिवण्याचा व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजक बनलेल्या जवळवाडी येथील सुनंदा जवळ यांचा समावेश होता. कोरोनाकाळात संकटग्रस्तांना भोजन आणि अन्नधान्य पुरविणारा रॉकस्टार आझाद ग्रुप आणि मुस्लिम जागृती अभियान या संस्थांच्या कार्यकर्त्यांनाही गौरविण्यात आले.

अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा परिचय करून दिला. अ‍ॅड. चैत्रा व्ही. एस. यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविक वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोहित जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राजक्ता महामुनी यांनी गीते सादर केली. कार्यक्रमास मिनाज सय्यद, दिलीप भोजने, जनार्दन घाडगे, उमेश खंडजोडे, डॉ. स्मिता कासार, प्रा. संजीव बोंडे, सुबोध कुलकर्णी, अ‍ॅड. राजीव अत्रे, जनार्दन पवार, राजीव मुळ्ये आदी उपस्थित होते. अ‍ॅड. वनराज पवार यांनी आभार मानले.