शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

सातारा : शहराजवळील वाढे फाटा चौकात आग लागल्याने तीन दुकानांतील साहित्य खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे ...

सातारा : शहराजवळील वाढे फाटा चौकात आग लागल्याने तीन दुकानांतील साहित्य खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दल आल्यानंतर आगीवर नियंत्रण आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाढे फाटा परिसरातील गाळ्यांमध्ये विविध प्रकारच्या व्यवसायाची दुकाने आहेत. एका ठिकाणी जवळजवळ इलेक्ट्रिकल, सलून व प्लंबिंग साहित्य विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास यामधील एका बंद दुकानाला आग लागली. त्यानंतर इतर दोन दुकानांत आग पोहोचली. या आगीमुळे बंद दुकानातून अचानक धुराचे लोट येऊ लागले. त्यामुळे नागरिकांचे या दुकानाकडे लक्ष गेले. स्थानिक युवकांनी उपलब्ध होईल त्या पाण्याने आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचबरोबर अग्निशमन दल व पोलिसांनाही माहिती देण्यात आली.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी आला. त्यानंतर आग विझविण्यात यश आले. तोपर्यंत तीनही दुकानांतील साहित्य जळाले होते. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

फोटो दि.२२सातारा आग फोटो नावाने...

फोटो ओळ : सातारा शहराजवळील वाढे फाटा येथे आगीत तीन दुकानांतील साहित्याचे नुकसान झाले. (छाया : जावेद खान)

.................