कृष्णानगरला महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST2021-03-04T05:12:09+5:302021-03-04T05:12:09+5:30

सातारा : सातारा शहराजवळील कृष्णानगर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी ...

Krishnanagar snatched the woman's mangalsutra | कृष्णानगरला महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कृष्णानगरला महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

सातारा : सातारा शहराजवळील कृष्णानगर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंदुबाई आप्पा काळे (वय ६०, रा. संगमनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार इंदुबाई काळे या राहत्या घरापासून चालत जात असताना दुचाकीवरून दोघेजण आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाने काळे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. त्याची किंमत सुमारे ३० हजार रुपये होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोघांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मछले हे तपास करीत आहेत.

.................................................

Web Title: Krishnanagar snatched the woman's mangalsutra