शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक सोय कोरेगाव तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

रुग्णालयात ५४३ रुग्णांवर उपचार; १२७६ जण गृह विलगीकरणामध्ये लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोरेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधी, ...

रुग्णालयात ५४३ रुग्णांवर उपचार; १२७६ जण गृह विलगीकरणामध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोरेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिक एकत्रित आले असून, त्यांनी जिल्ह्यात एक वेगळा पायंडा पाडला आहे. सद्य:स्थितीत ४ व्हेंटिलेटर बेड्स, २०७ ऑक्सिजन बेड्स, ३२४ साधे बेड्स तालुक्यात उपलब्ध आहेत. केवळ खटाव, माण तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक रुग्ण कोरेगाव तालुक्यात उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत ५४३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, १२७६ जण गृह विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत.

आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयाची मोठी इमारत उभी केली असून, तेथे एक शासकीय कोविड हॉस्पिटल आणि चॅलेंज अकॅडमी येथे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे, तर आमदार महेश शिंदे यांनी काडसिद्धेश्वर कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशननजीक काडसिद्धेश्‍वर कोविड हॉस्पिटलची उभारणी केली आहे. ब्रम्हपुरी (रहिमतपूर) व शिवसाई मंगल कार्यालय (वाठार स्टेशन) येथे कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे.

शासकीय यंत्रणेला खासगी वैद्यकीय व्यावसायिक पाठबळ देत आहेत. पाटील हॉस्पिटल, श्रीरंग नर्सिंग होम, कोरेगाव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, श्री क्लिनिक व धनंजय हॉस्पिटल, आदी रुग्णालये पूर्ण क्षमतेने कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहेत. केवळ खटाव, माण तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक रुग्ण कोरेगाव तालुक्यात उपचार घेत आहेत. महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींचा समन्वय त्याचबरोबर नागरिकांची जागरूकता यामुळे कोरेगाव तालुका लवकरात लवकर पूर्ण कोरोनामुक्त होईल, असा विश्वास वाटतो.