शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार : महेश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST

कोरेगाव : ‘कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यांना आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल,’ अशी ग्वाही ...

कोरेगाव : ‘कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यांना आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल,’ अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.

कोरेगाव नगरपंचायतीच्या १०५ कर्मचाऱ्यांचा सामूहिक आरोग्य विमा उतरविण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या हिश्याची ५० टक्के रक्कम आमदार शिंदे यांनी स्वत: भरली. या कर्मचाऱ्यांना विमा योजनेच्या कागदपत्रांचे वितरण शनिवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राहुल प्र. बर्गे, सुनील खत्री, संतोष जाधव, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक जयवंत पवार, महेश बर्गे, राहुल र. बर्गे, सुनील बर्गे, निवास मेरुकर उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, ‘कोरोना काळात कमी पगारात नगरपंचायतीचे कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. अनेक महिने त्यांचे पगार होत नाहीत. त्यांच्या शासन सेवेतील समावेशनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. याबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा झाली असून, त्यांनी दोन दिवसांत बैठक बोलविणार असल्याचे स्पष्ट केले. एकाही कर्मचाऱ्याचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही. ज्या दिवशी नगरपंचायतीची स्थापना झाली. त्या दिवसापासून कर्मचारी वर्गाला सामावून घेतले गेले पाहिजे, अशी भूमिका आहे. नगरविकासमंत्र्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे.’

यावेळी नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजित बर्गे, प्रकाश बर्गे, धनंजय पंडित, धनंजय भुजबळ, प्रताप बुधावले, सुरज मदने, संतोष सरगडे, गौतम येवले, बबन पाटोळे, रामचंद्र बोतालजी आदींनी अडचणी मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची ग्वाही आमदार शिंदे यांनी दिली.