कोरेगावात मुख्याधिकारी ‘ॲक्शन मोड’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST2021-03-22T04:34:49+5:302021-03-22T04:34:49+5:30

कोरेगाव : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे ‘ॲक्शन मोड'मध्ये आल्या आहेत. पंचायतीचे पथक तयार करून त्यांनी ...

Koregaon chief in 'action mode' | कोरेगावात मुख्याधिकारी ‘ॲक्शन मोड’मध्ये

कोरेगावात मुख्याधिकारी ‘ॲक्शन मोड’मध्ये

कोरेगाव : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे ‘ॲक्शन मोड'मध्ये आल्या आहेत. पंचायतीचे पथक तयार करून त्यांनी दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. या पथकाला शहरात विनामास्क फिरताना व्यक्ती आढळल्यास दंड वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पथकांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.

ऑक्टोबर ते जानेवारीत कोरोना नियंत्रणात आला असताना, नागरिकांकडून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित वावर या त्रिसूत्रीचा भंग केला गेल्याने कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. यामुळे फेब्रुवारी ते मार्चदरम्यान कोरोनावाढीचा वेग वाढल्याने नगरपंचायत प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. बाजारपेठा, शासकीय कार्यालये, किराणा दुकानदार, फळविक्रेते, भाजी विक्रेते, औषध विक्रेते, हातगाडीवरील विक्रेते मास्क घालत नसल्याचे आढळल्याने घाडगे यांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पथक कार्यान्वित केले आहे.

कोट..

मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित वावर या त्रिसूत्रीचा नागरिकांकडून अवलंब होत नसल्याने, ते कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना गुन्हादेखील दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- विजया घाडगे, मुख्याधिकारी.

Web Title: Koregaon chief in 'action mode'