शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

निवाऱ्याला असूनही ‘खाकी’ ओलिचिंब !

By admin | Updated: July 22, 2014 22:50 IST

रेल्वे पोलीस : छताला गळती, दूरक्षेत्रात पाणीच पाणी

कऱ्हाड : पावसापासून बचाव करण्यासाठी छताखाली छत्री घेण्याची आवश्यकता नसते; पण रेल्वे पोलिसांवर सध्या ही वेळ येऊन ठेपलीय. छत गळत असल्याने पोलीस दूरक्षेत्रातच हे कर्मचारी छत्री घेऊन बसतायत. फर्शीवर पाण्याचे डबके साचल्याने त्यांना पायही खुर्चीवर ठेवून बसावं लागतंय. येथील रेल्वे स्थानकात (ओगलेवाडी) रेल्वे प्रशासनाचे पोलीस दूरक्षेत्र आहे. या दूरक्षेत्रात एक हवालदार व दोन कर्मचारी कार्यरत आहेत. रेल्वे स्थानकात वर्दळ असल्याने या कर्मचाऱ्यांना चोवीस तास सतर्क रहावे लागते. स्थानक परिसरात होणारे अपघात, गुन्हेगारी घटनांवेळी हे कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत असतात. मात्र, असे असताना या कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा देण्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वास्तविक, पूर्वी दूरक्षेत्राची जागा स्टेशन मास्तरनजीकच्या खोलीमध्ये होती. त्यानंतर तेथून हे दूरक्षेत्र हटवून पाण्याच्या टाकीकडे नेण्यात आले. मात्र, तेथेही अनेक समस्या निर्माण होऊ लागल्याने स्थानकाच्या एका बाजूस एका खोलीत हे दूरक्षेत्र सुरू करण्यात आले. संबंधित खोली स्लॅबची आहे. मात्र, खोलीचा स्लॅब गळत असल्याने कर्मचाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने दूरक्षेत्रात तळे निर्माण झाले आहे. स्लॅब पूर्णत: गळत असल्याने कर्मचाऱ्यांना दूरक्षेत्रातून बाहेर पडावे लागले आहे. ही गळती रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्लॅबवर ताडपत्री टाकली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ताडपत्री भिजून पाणी स्लॅबमधून खाली झिरपत आहे. अवघ्या काही तासातच दूरक्षेत्रात पाणीच पाणी होत असल्याने कर्मचारी धायकुतीला आले आहेत. स्लॅबच्या गळतीपेक्षा पाऊस बरा, असे म्हणण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. मंगळवारी पावसाचा जोर जास्तच असल्याने कर्मचाऱ्यांना दूरक्षेत्रात छत्री घेऊन बसावे लागले. (प्रतिनिधी)-----निवासस्थानांचीही मोठी दुर्दशारेल्वे पोलिसांसाठी परिसरातच निवासस्थान आहे. मात्र, या निवासस्थानांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. निवासस्थाने राहण्यायोग्यच नसल्याची परिस्थिती आहे. पावसाळ्यात त्याठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते. छत गळते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबीयांना नरकयातना भोगाव्या लागतात. पोलीस दूरक्षेत्र व निवासस्थानांच्या दुरूस्तीबाबत येथील कर्मचाऱ्यांनी वारंवार वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्या मागणीकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते.