शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

खटावकरांना लागले पंतप्रधानांच्या आगमनाचे वेध

By admin | Updated: May 22, 2015 00:18 IST

हालचालींना वेग : मोदींच्या हस्ते होणार गुरूंच्या तैलचित्राचे अनावरण

खटाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच खटावला येण्यासाठीच्या हालचालींना पुन्हा वेग आला असल्यामुळे आता खटावकरांना पंतप्रधानांच्या आगमनाचे जणू वेध लागले आहेत. मोदींचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. नरेंद्र मोदी यांना लहानपणापासून मार्गदर्शन करणारे त्यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुरू लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) हे मूळचे खटावचे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम गुजरातमधून केले. याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांना लहान वयात संघाच्या माध्यमातून घडविण्याचे काम इनामदार यांनी केले. ज्या गुरुंनी आपल्याला घडविले त्यांची ओळख पंतप्रधान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी विसरले नाहीत. निवडून आल्यानंतर तासगावच्या सभेत त्यांनी आपल्या गुरुंचा उल्लेख करताना खटावचे नाव घेतले होते. पंतप्रधान झाल्यानंतर ते खटावला गुरुंच्या गावाला भेट देणार, अशा जोरदार चर्चा होत्या. आता पुन्हा एकदा मोदींच्या आगमनाची उत्सुकता वाढू लागली आहे. खटावमध्ये लक्ष्मी-नारायण मंदिरात सभागृह बांधण्यात आले आहे. त्या सभागृहाला मोदींच्या गुरुंचे नाव देण्यात आले आहे. तसेच या सभागृहात लक्ष्मणराव इनामदार यांचे तैलचित्र बसविण्यात येणार आहे. त्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एम. एन. इनामदार तसेच लक्ष्मणराव इनामदार यांचे बंधू, ट्रस्टचे पदाधिकारी व सहकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच दिल्ली येथे त्यांची भेट घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. (वार्ताहर)लक्ष्मणराव इनामदार यांच्या बंधंूसह ट्रस्टचे पदाधिकारी दिल्लीला जाणार आहेत. त्या भेटीत पंतप्रधान खटावला येण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे.- एम. एन. इनामदार, अध्यक्ष लक्ष्मी-नारायण देवस्थान ट्रस्ट, खटाव