शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

‘कचरा’ हद्दपार करण्याची वेळ आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

सातारा : ‘सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी, हा तर केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे, हे सातारकर ओळखून ...

सातारा : ‘सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी, हा तर केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे, हे सातारकर ओळखून आहेत. त्यामुळे पालिकेतील ‘कचरा’ हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, परवाच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना काढल्याने सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरू केला आहे. निवडणूक आयोगाने सूचना थोडी उशिरा काढली असती तर सातारकरांना हा थापेबाजी पाऊस आज दिसला नसता, हा कथित विकासकांचा पाऊसही लांबला असता. सत्ताधारी नेत्यांनी पत्रकबाजी करून पाडलेला पाऊस हा निवडणुकीचा मोसम आल्यानेच पडला आहे, हे सातारकर जनता चांगलीच ओळखून आहे. आपल्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांनी कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांची गचुंडी धरली, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प, घंटागाडी अशा सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला.

हद्दवाढ होऊन आता वर्षभराचा कालावधी लोटला, पण हद्दवाढीतील नवीन भागासाठी एकही काम सत्ताधाऱ्यांनी केलं नाही. कोरोना महामारीचा विळखा बसला असताना साधं एक आयसोलेशन सेंटर सुरू केलं नाही. नेहमीसारखं सत्ताधारी नगरसेवक आणि मर्जीतल्या ठेकेदारांचे खिसे भरून स्वत:ची तुंबडी भरण्याचा उद्योग होणार नाही, याची दक्षता नेत्यांनी घ्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

(चौकट)

विकासकामांचा दुष्काळ

अन् भ्रष्टाचाराचा सुकाळ

शहराचा विकास होईल या अपेक्षेने सातारकरांनी एकहाती सत्ता दिली, पण सातारकारांचा मोठा अपेक्षाभंग झाला. सातारा पालिकेत कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांचे गळे धरण्याच्या ऐतिहासिक घटना सातारकरांना पाहाव्या लागल्या. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून सत्ताधाऱ्यांनी केवळ भ्रष्टाचाराचा सुकाळ केला, असा घणाघातही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.

फोटो : शिवेंद्रसिंहराजे