साजूरच्या शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

By Admin | Updated: November 2, 2015 23:57 IST2015-11-02T21:22:08+5:302015-11-02T23:57:34+5:30

उपक्रमात अग्रेसर : दर्जेदार शिक्षणाने गुणवत्ता वाढीस

'ISO' ranking for the school of the celebrated | साजूरच्या शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

साजूरच्या शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

तांबवे : गुणवत्तापूर्वक विद्यार्थी व दर्जेदार शैक्षणिक सुविधा असल्यास ग्रामीण भागातील शाळा ‘आयएसओ’ मानांकन ठरू शकते. शहरातील खासगी शाळेतील सुविधांनाही मागे टाकण्याचे काम ग्रामीण भागातील शाळा करतात. असेच काम कऱ्हाड तालुक्यातील साजूर येथील जिल्हा परिषद शाळेने केले आहे. दर्जेदार शैक्षणिक सुविधांबरोबर गुणवत्ताही चमकून तालुक्यातील इतर शाळांच्या तुलनेत ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करणारी ही शाळा ठरली आहे.
या शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा, ई-लर्निंग,सुसज्ज प्रयोगशाळा, १९ संगणकांचा कक्ष, एक हजाराहून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय, गांडूळखत प्रकल्प, ठिबक सिंचन, सौरऊर्जा प्रकल्प, वॉटर प्युरिफायर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्वच्छ गणवेशधारी विद्यार्थी तसेच अनुभवी शिक्षक अशा सुविधांसह अनेक पर्यावरणाचे उपक्रम राबविले जातात.
डिजिटल पद्धतीने संगणकीय शिक्षणाबरोबर उत्तम प्रकारचे संस्कारही या शाळेतील विद्यार्थ्यांच्यावर येथील शिक्षकांकडून केले जातात. जिल्हा परिषदेची शाळा असूनही खासगी शाळांनाही विविध शैक्षणिक उपक्रम व सुविधांच्या बाबतीत या शाळेने मागे टाकले आहे.
शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक प्रभाकर मोरे, पदवीधर शिक्षक राजाराम कारंडे, उपशिक्षक संतोषकुमार कांबळे, शिक्षिका विजया ताटे, सुलभादेवी पाटील,
वैशाली यादव, सरपंच शीतल मुळगावकर, उपसरपंच संदीप पाटील आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आहेत. (वार्ताहर)

Web Title: 'ISO' ranking for the school of the celebrated