शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ मंदिराजवळचा थांबा हटविण्यासाठी पाहणी

By admin | Updated: October 30, 2015 23:41 IST

वाहतुकीच्या कोंडीवर पर्याय : तिकाटण्यावर तिरकी बस उभी करण्याचा शिरस्ता होणार हद्दपार--लोकमतचा पाठपुरावा

सातारा : येथील समर्थ मंदिर तिकाटण्यावर बोगद्याकडून येणाऱ्या एसटी बसेस तिरक्या लावून तिन्ही रस्त्यांवरची वाहतूक रोखून धरण्याचा जुनाट शिरस्ता हद्दपार होण्याचा मार्ग खुला झाला आहे. समर्थ मंदिर ते अदालत वाडा रस्त्यावर नवा थांबा करण्यासाठी महामंडळाकडून गुरुवारी सर्वेक्षण करण्यात आले.सज्जनगड, कास, बामणोली येथून सातारा शहरात येणाऱ्या एसटी गाड्या पूर्वीपासूनच समर्थ मंदिर परिसरात उभ्या राहत आहेत. त्याकाळात फारशी अडचणही भासत नव्हती; मात्र आता समर्थ मंदिर परिसरात दुकाने तसेच धस कॉलनी, चिपळूणकर बाग, शिक्षक कॉलनी, गुरुकुल कॉलनी झाली आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या वाढली आहे. प्रत्येकाच्या घरी किमान दोन दुचाकी गाड्या आल्या आहेत. त्यामुळे हा चौक कायमच वर्दळीचा बनला आहे.दररोज सकाळी नऊ ते अकरा व सायंकाळी पाच ते सात या काळात या चौकात प्रचंड गर्दी असते. तरीही बाहेर गावाहून आलेल्या गाड्या चौकात तिरक्याच लावल्या जातात. याचवेळी आणखी एक-दोन गाड्या आल्या तर सर्व गाड्या एकामागे एक उभ्या असतात. या समस्यावर ‘लोकमत’ने अनेक वेळा आवाज उठविला आहे. त्यानंतर स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर सुहास राजेशिर्के व ज्येष्ठ नागरिक संघाचे देशपांडे यांनी सह्यांची मोहीम राबविली. हे निवेदन त्यांनी एसटीचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी दिले. ‘लोकमत’ने मांडलेल्या जनतेची व्यथा आणि स्थानिकांच्या भावनांचा आदर करत राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभागीय वाहतूक कार्यालयातील वाहतूक निरीक्षक मनोज देशमुख व सातारा आगारातील स्थानक प्रमुख नौशाद तांबोळी यांनी चौकात येऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)पर्यायी जागा अन् स्टेजचा मेळ बसविण्याचा प्रयत्नतिकाटण्यात गाडी उभी केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यावर पर्याय म्हणून गोविंदनगरी वसाहतीसमोर असलेल्या विस्तृत जागेत गाडी उभी करणे सोपे आहे. मात्र, बाहेर गावाहून येणार असलेल्या गाड्यांचे स्टेज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जागा आणि स्टेज यांचा अभ्यास करून जागा निश्चित केली जाणार आहे.